विकास दुबे चकमक : ‘कार नाही पलटली, तर सरकार पलटण्यापासून वाचले’

8 पोलीस कर्मचाऱ्यांची हत्या करणारा गँगस्टर विकास दुबे आज सकाळी पोलिसांसोबतच्या चकमकीत मारला गेला. पोलिसांनी सांगितले की, विकालसाल उज्जैनवरून रस्त्याने कानपूरला घेऊन जाणाऱ्या उत्तर प्रदेश एसटीएफ ताफ्यातील गाडीचा अपघात झाला. यानंतर विकास दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला असताना पोलिसांना गोळीबार करावा लागला, यात त्याचा मृत्यू झाला.

विकास दुबेच्या एन्काउंटरनंतर आता उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी पोलीस आणि उत्तर प्रदेश सरकारच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

अखिलेश यादव यांनी ट्विट केले केले की, ही कार पलटी झाली नसून, गुपिते समोर येण्यापासून सरकार पलटण्यापासून वाचले.

दरम्यान, अनेक दिवसांपासून फरार असलेल्या विकास दुबेला उज्जैन पोलिसांनी गुरूवारी सकाळी अटक केले होते. कानपूर पोलीस आणि एसटीएफ टीम रस्ते मार्गाने त्याला कानपूरला घेऊन जात असताना गाडीचा अपघात झाला. यात विकास दुबे आणि एका पोलीस कर्मचाऱ्याला दुखापत झाली. या दम्यान विकास दुबेने पोलीस कर्मचाऱ्याची बंदूक हिसाकवून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आत्मसमर्पण करण्यास सांगितले मात्र त्याने नकार दिला व पोलिसांवर गोळ्या चालवल्या. यावेळी पोलिसांनी आत्मरक्षेसाठी केलेल्या गोळीबारात विकास दुबे मारला गेला.

Leave a Comment