पुण्यापाठोपाठ नांदेडमध्ये देखील रविवारपासून 20 जुलैपर्यंत कडकडीत लॉकडाऊन


नांदेड – पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी नुकतीच पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये 15 दिवसांचा लॉकडाऊन घोषित केल्यानंतर नांदेडमध्ये देखील 12 जुलै मध्यरात्रीपासून ते 20 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत शहरात कडकडीत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय एका बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी घेतला आहे. नांदेड शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत असल्यामुळे औरंगाबादप्रमाणे कडक लॉकडाऊन केल्यास परिस्थिती नियंत्रणात राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान शहरातील नागरिक व व्यापारी भाजीपाला आणि किराणा तसेच बँक व इतर देखील कडकडीत बंद ठेवा, फक्त मेडिकल व दवाखाने सुरू ठेवा, दूध आणि पेपरसाठी सकाळी 6 ते 8 अशी वेळ द्या. एकदाच लॉकडाऊन करा. पण कडकडीत करा. अशी मागणी करत आहेत. त्यांच्या या मागणीवर जिल्हाधिकाऱ्यांनी आता नांदेड संपुर्ण लॉकडाऊन करण्याच निर्णय घेतला आहे. या लॉकडाऊच्या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहतील असे त्यांनी म्हटले आहे.

Leave a Comment