महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचे स्टँडअप कॉमेडियनकडून अपमान


मुंबई – महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआने केलेल्या वक्तव्यामुळे आता नवा वाद निर्माण झाला आहे. जोशुआने एका स्टँडअप शोदरम्यान शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील प्रस्तावित पुतळ्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. सोशल मीडियावर जोशुआचा हा व्हिडिओ व्हायरल झाला असून तिच्यावर अनेक शिवप्रेमींनी कठोर शब्दात टीका करत तिच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.

(व्हिडीओ सौजन्य – Exploring Maharashtra)
मुंबईजवळ अरबी समुद्रात बांधण्यात येणाऱ्या शिवस्मारकाच्या विषयावरुन एका स्टँडअप शोमध्ये अग्रिमाने विनोद निर्मिती करण्याचा प्रयत्न केला. तिने यामध्ये शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेखही केला. अग्रिमाने उपहासात्मक विनोद करण्याच्या नादात मुंबईमध्ये बांधण्यात येणाऱ्या शिवस्मारकाबद्दल मला जाणून घ्यायचे होते. म्हणून मी इंटरनेटवरील सर्वात विश्वासार्ह साईटवर गेले आणि ती म्हणजे क्वोरा, असे म्हटले. तिने यापुढे क्वोरावर या स्मारकाबद्दल काय काय लिहिले होते असे सांगताना, एकाने लिहिलेला भलामोठ्या आकाराचा निबंध मला तिथे सापडला.
शिवाजी पुतळा पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी मास्ट्ररस्ट्रोक असल्यामुळे महाराष्ट्राचे भले होईल असे या निबंधामध्ये लिहिले होते. तर दुसऱ्या एकाला वाटले की येथे क्रिएटिव्हिटी कॉंन्सेंट सुरु आहे. म्हणून त्याने तिथे, या स्मारकात जीपीएस ट्रॅकरसुद्धा असणार स्मारकाच्या डोळ्यात लेझर लाईट निघेल जिच्या माध्यमातून अरबी समुद्रातून येणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्म केला जाईल. तर एकाने तिथे येऊन तुमची माहिती नीट करुन घ्या आणि शिवाजी नाही तर शिवाजी महाराज म्हणा, असे लिहिले होते… मी याच शेवटच्या व्यक्तीला फॉलो केले, असे अग्रिमा म्हणाली.


सोशल मिडियावर अग्रिमाचा हा व्हिडिओ व्हायरल झाला असून तिच्यावर कारवाई करण्याची अनेकांनी मागणी केली आहे. अग्रिमावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करणारे पत्र शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनीही राज्याच्या गृहमंत्र्यांना लिहिले आहे. तसेच यासंदर्भातील एक व्हिडिओही सरनाईक यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या मुजोर कॉमेडियन अग्रीमा जोशुआला ताबडतोब अटक करण्यासंदर्भात मी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहिले आहे. या विषयांची आपण अत्यंत गंभीर दखल घेऊन असल्या विकृत कॉमेडियनला अटक करून कडक कायदेशीर कारवाई करावी अशी माझी मागणी असल्याचे सरनाईक यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Leave a Comment