नीतू सिंह यांच्या पार्टीत सामील झाला करण जोहर, नेटकऱ्यांनी केले केजोमती नामकरण


बॉलिवूडमधील घराणेशाहीचा मुद्दा अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्येनंतर पुन्हा एकदा ऐरणीवर आला आणि याच मुद्यावरुन सोशल मीडियावर मोठा वाद सुरु झाला. त्यातच नेटकऱ्यांच्या रडारावर बॉलीवूडचा डॅडी अर्थात निर्माता-दिग्दर्शक करण जोहर आला. त्याच्यावर नेटकऱ्यांनी आपला संताप व्यक्त करत त्यालाच टीकेचे धनी बनवले. पण या टीकेमुळे करण जोहर पुरता रडकुंडीला आल्याचे त्याच्या जवळच्या मित्राकडून सांगण्यात आले होते. पण करण जोहरने नुकत्याच एका पार्टीला हजेरी लावल्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.


नुकताच बॉलिवूड अभिनेत्री नीतू कपूर यांनी त्यांचा ६२ वा वाढदिवस साजरा केला. या बर्थडे पार्टीमध्ये कुटुंबीय आणि काही जवळच्या मित्रांचा समावेश होता. करण जोहरदेखील या पार्टीत दिसून आला. आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर नीतू कपूर यांनी वाढदिवसाचे काही फोटो शेअर केले आहेत. त्या फोटोमध्ये करण देखील दिसून येत आहे. नीतू यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये रणबीर कपूर, रिद्धिमा कपूर-साहनी, रीमा जैन, अरमान जैन आणि करण जोहरसह अन्य काही कलाकार मंडळी दिसून येत आहेत.


दरम्यान करणने सुशांतच्या निधनानंतर सोशल मीडियावर येणेच बंद केले आहे. तो गेल्या अनेक दिवसांत कुठेही बाहेर पडलेला दिसला नाही. पण नीतू सिंह यांच्या बर्थ डे पार्टीत त्याला पाहून युजर्स पुन्हा त्याच्यावर तुटून पडले आहेत. या पार्टीच्या व्हायरल झालेल्या एका फोटोत करण जोहर हसत हसत पोज देताना दिसत आहे. या फोटोवरुन युजर्सनी करणला पुन्हा ट्रोल करण्यास सुरुवात केली. दरम्यान एका युजरने तर करण जोहरचे ‘केजोमती’ असे नामकरण केले आहे. त्याचबरोबर मला तर ड्रामा क्वीन केजोमतीच्या चेह-यावर जराही दु:ख दिसत नसल्याचे या युजरने म्हटले आहे.

Leave a Comment