WHOचे घुमजाव! मान्य करावे लागले हवेतून होते ‘कोरोना’चे संक्रमण


नवी दिल्ली – कोरोना व्हायरस ‘एअरबोर्न ट्रान्समिशन’ द्वारे पसरल्याचे काही पुरावे मिळाल्याचे मंगळवारी अखेर जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मान्य केले आहे. कोरोनाचे विषाणू हवेमुळे पसरत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे, तरीही अधिक डेटा गोळा करणे बाकी असल्याचे आरोग्य संघटनेने म्हटले आहे. तत्पूर्वी 32 देशातील 239 शास्त्रज्ञांनी आरोग्य संघटनेला एक पत्र लिहिले होते, त्यात हवेतून हा विषाणू पसरू शकतो आणि त्यांनी मार्गदर्शक तत्त्वे बदलली पाहिजेत, असे म्हटले होते.

32 देशांतील 239 शास्त्रज्ञांचा असा दावा आहे की, हवेतूनही कोरोनाचे संक्रमण होऊ शकते. पण याबद्दल जागतिक आरोग्य संघटना गंभीर नाही आणि आपल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये संघटनेनेही मौन बाळगले आहे. या शास्त्रज्ञांनी असा दावा केला आहे की, शिंका आल्यानंतर हवेत लांब जाणारे लहान लहान थेंब जे हवेत जातात ते खोलीत किंवा नियुक्त ठिकाणी उपस्थित लोकांना संक्रमित करण्यास सक्षम असतात. बंद हवेत ते बराच काळ उपस्थित राहतात आणि आजूबाजूच्या सर्व लोकांना संक्रमित करतात.


डब्ल्यूएचओच्या बेनेडेटा आल्लेग्रान्झी यांनी पुन्हा एकदा टीकेचा सामना करत मंगळवारी सांगितले की, विषाणूचा प्रसार सार्वजनिक ठिकाणी, विशेषत: गर्दी, कमी वारा आणि बंद भागात हवेतून होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तथापि, हे पुरावे गोळा करण्याची आणि समजून घेण्याची आवश्यकता आहे. हे काम आम्ही सुरू ठेवू. त्या पुढे म्हणाल्या की, कोरोनाचा प्रसार हवेतून होत असल्याचा पुरावा आहे, पण ते निश्चितपणे सांगता येत नाही. जागतिक आरोग्य संघटनेतील कोरोना महामारीच्या संबंधित तांत्रिक आघाडी असलेल्या मारिया वा केरखॉव्ह यांनी सांगितले की, हवेच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार होण्याच्या शक्यतेबद्दल आम्ही बोलत आहोत, याबाबत पुष्कळ पुरावे असणे आवश्यक आहे.

Leave a Comment