महाराष्ट्रातील 9 महिन्याच्या गर्भवती माऊलीची हॉस्पिटलमध्ये पोहचण्यासाठी 28 किमी पायपीट - Majha Paper

महाराष्ट्रातील 9 महिन्याच्या गर्भवती माऊलीची हॉस्पिटलमध्ये पोहचण्यासाठी 28 किमी पायपीट

महाराष्ट्रातील गडचिरोली येथील धक्कादायक घटना समोर आली आहे. गडचिरोलीतील भामरागढ येथील एका गर्भवती आदिवासी महिलेला हॉस्पिटलमध्ये पोहचण्यासाठी तब्बल 28 किमीचा प्रवास पायी पुर्ण करावा लागला. या संदर्भात आज तकने वृत्त दिले आहे.

Image Credited – Aajtak

भामरागढ हा ग्रामीण भाग आहे. गावातील रोशनी पोदाडी या गर्भवती होत्या. बाळाला जन्म देण्यासाठी त्यांना हॉस्पिटलमध्ये जायचे होते. मात्र गावापासून सर्वात जवळील हॉस्पिटल 28 किमी लांब होते. येण्या-जाण्यासाठी कोणतेही साधन नसल्याने रोशनी आणि त्यांच्या कुटुंबाने पायानेच हॉस्पिटलमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.

Image Credited – Aajtak

भरपावसात नदी पार करत रोशनी व त्यांचे कुटुंब हॉस्पिटलमध्ये पोहचले. यानंतर त्यांनी हेमलकसा येथील लोक बिरादरी हॉस्पिटलमध्ये एका बाळाला जन्म दिला. एवढेच नाहीतर बाळाला जन्म दिल्यानंतर या महिलेने पुन्हा घरी जाण्यासाठी बाळाला सोबत घेऊन पायी प्रवास केला. येथे येण्या-जाण्याचे कोणतेही साधन नसल्याने, मुख्यधारेला हा भाग जोडणे खूप अवघड आहे. येथे अद्याप रस्त्याची निर्मिती झालेली नाही.

Leave a Comment