सुशांतच्या ‘दिल बेचारा’च्या ट्रेलरला मिळाले विक्रमी व्ह्यूज


अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांने १४ जून रोजी आत्महत्या करत आपले जीवन संपवले. त्यानंतर त्याचा शेवटचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत ठरत असलेल्या ‘दिल बेचारा’ या चित्रपटाचा ट्रेलर काल रिलीज करण्यात आला. त्याच्या या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर अवघ्या काही काळात या ट्रेलरला विक्रमी व्ह्युज मिळाले असून कमी कालावधीत सर्वाधिक व्ह्युज मिळविणारा या चित्रपटाचा ट्रेलर ठरला आहे.


अवघ्या २४ तासांमध्ये सोमवारी प्रदर्शित झालेल्या ‘दिल बेचारा’च्या ट्रेलरला २०० दशलक्षापेक्षा अधिक व्ह्युज मिळाले आहे. विशेष म्हणजे तीन मिनीटांच्या या ट्रेलरला अवघ्या तासाभरात तब्बल पाच दशलक्षापेक्षा जास्त जणांनी पाहिल्यामुळे कमी कालावधीत सर्वात जास्त वेळा पाहिला गेलेला हा ट्रेलर ठरला आहे. किझी आणि मॅनी यांची प्रेमकथा थोडक्यात प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमधून उलगडण्यात आली आहे. किझी कॅन्सरग्रस्त आहे आणि मॅनीचे तिच्यावर खूप प्रेम आहे. पण ही प्रेमकथा सामान्य नाही, यात अनेक चढउतार दाखवण्यात येणार आहे.

Leave a Comment