मुंबई मेट्रोमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, 1.23 लाखांपर्यंत पगार

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी असून, मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन डेव्हलपमेंट अथॉरिटीने (एमएमआरडीए) मुंबई मेट्रोमध्ये विविध पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. एकूण 110 जागांसाठी एमएमआरडीएने अर्ज मागवले असून, या संदर्भातील जाहिरात आपल्या वेबसाईटवर प्रकाशित केली आहे.

पदे –

एकूण 110 जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या मध्ये टेक्निशियन 1 – 53, टेक्निशियन (सिव्हिल) 1 – 8, टेक्निशियन (सिव्हिल) 2 – 2, टेक्निशियन (एसएंडटी) 1 – 39, टेक्निशियन (एसअँडटी) 2 – 2, टेक्निशियन (ईअँडएम) 1 – 1, टेक्निशियन (एसअँडटी) 2 – 1, ट्रेन ऑपरेटर (शंटिंग) – 1, ज्यूनियर इंजिनिअर (स्टोर) – 1, ट्रॅफिक कंट्रोलर – 1 आणि हेल्पर – 1 या पदांचा समावेश आहे.

पगार –

वेगवेगळ्या पदांनुसार पगार देण्यात असून, निवड झालेल्या उमेदवारांना 15 हजार रुपये ते 1,22,800 रुपयांपर्यंत पगार मिळेल.

अर्जाची तारीख –

या पदांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 27 जून 2020 पासून सुरू झाली असून, अर्जाची अंतिम तारीख 27 जुलै 2020 आहे. सामान्य श्रेणीसाठी अर्ज शुल्क 300 रुपये असून, आरक्षित वर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 150 रुपये आहे.

शिक्षण व वयाची अट –

पदांनुसार शिक्षण व वयाची अट वेगवेगळी आहे. उमेदवार अधिक माहिती व ऑनलाईन अर्जासाठी एमएमआरडीएची वेबसाईट mmrda.maharashtra.gov.in ला भेट देऊ शकतात.

Leave a Comment