ब्राव्होने रिलीज केले धोनीच्या वाढदिवशी हे खास गाणे


भारतीय संघाचा माजी कर्णधार कॅप्टन कूल अर्थात महेंद्र सिंह धोनीचा आज 39 वा वाढदिवस असून त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्समधील त्याचा सहकारी खेळाडू आणि वेस्टइंडीजचा ऑल राउंडर ड्वेन ब्राव्होने एक खास गाणे बनवले आहे. ब्राव्होने धोनीसाठी तयार करण्यात आलेल्या या गाण्यामध्ये धोनीचा रांची पासूनचा वर्ल्डकप जिंकण्यापर्यंतचा प्रवास दाखवला आहे. हे गाणे ब्राव्होने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहे.


ब्राव्होने धोनीवर तयार करण्यात आलेले हे गाणे त्यांच्या चाहत्यांच्या देखील पसंतीस उतरत आहे. त्याचबरोबर या गाण्यावर भरभरुन प्रतिक्रिया देत आहेत. महेंद्र सिंह धोनी आज अनेकांसाठी प्रेरणास्थान आहे. त्याच्या स्वभावाने आणि कामगिरीने त्याने अनेकांची मने जिंकली आहेत. ड्वेन ब्राव्होने धोनीला ट्रिब्यूट म्हणून तयार केलेल्या या गाण्यात त्याने हेलिकॉप्‍टर शॉट आणि त्याच्या 7 आकड्या बद्दल देखील उल्लेख केला आहे.


चेन्नई सुपर किंग्सने ऑफिशियल टि्वटर हँडलवर ब्राव्होचे हे गाणे शेअर करत हेलिकॉप्‍टर 7 ने उड्डाण केले आहे. ब्राव्होचा थाला एमएस धोनीला ट्रिब्‍यूट। हॅप्‍पी बर्थडे एमएस धोनी, असे म्हटेल आहे.

Leave a Comment