मोदी सरकारच्या ‘या’ तीन चुका हावर्ड विद्यापीठात अभ्यासाचा विषय असतील


नवी दिल्ली: देशातील कोरोना व्हायरसच्या वेगाने वाढत असलेल्या संसर्गावरुन काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना कोरोना, नोटबंदी आणि जीएसटी या तीन गोष्टी भविष्यात हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये अभ्यासाचा विषय असतील, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 21 दिवसात कोरोनाला पराजित करु या वक्तव्याचा व्हिडीओ शेअर करत राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे. भविष्यात अपयशाच्या केसस्टडीजमध्ये कोरोना, नोटबंदी आणि जीएसटीमधील चुका हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये अभ्यासाचा विषय असतील, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

देशातील नागरिकांशी 25 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला होता. त्यांनी त्यावेळी आज कोरोना विषाणूच्या संसर्गाविरोधात संपूर्ण देश युद्ध लढत आहे. त्यासाठी आपल्याला 21 दिवस लागणार आहेत. महाभारताच्या काळातील युद्ध 18 दिवसांमध्ये जिंकले होते. आज देशातील कोरोना संसर्गाविरोधातील हे युद्ध आपण 21 दिवसात जिंकण्याचा प्रयत्न असेल, असे म्हटले होते.

Leave a Comment