राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत काल दिवसभरात 6555 नव्या रुग्णांची नोंद


मुंबई : काल दिवसभरात राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत 6 हजार 555 नव्या रुग्णांची नोंद झाल्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता 2 लाख 6 हजार 619 एवढी झाली आहे. तर काल 3 हजार 658 जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. आतापर्यंत एकूण 1 लाख 11 हजार 740 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान राज्यात एकूण 86 हजार 40 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. तर राज्यभरात काल 151 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

कालपर्यंत पाठवण्यात आलेल्या 11 लाख 12 हजार 442 नमुन्यांपैकी 2 लाख 6 हजार 619 (18.57 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6 लाख 4 हजार 463 लोक होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 46 हजार 62 लोक संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत.

दिलासादायक बाब म्हणजे काल दिवसभरात एकूण 3 हजार 658 जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे 54.08 टक्के एवढे प्रमाण आहे. राज्यभरात आतापर्यंत 1 लाख 11 हजार 740 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

Loading RSS Feed

Leave a Comment