शिक्कामोर्तब; 8 जुलैपासून कंटेन्मेंट झोन वगळता सुरु होणार राज्यातील हॉटेल-लॉज


मुंबई : नुकतेच राज्याचे मुख्य सचिव यांनी राज्यातील हॉटेल आणि लॉज सुरु करण्याची परवानगी मिळाली असून येत्या 8 जुलैपासून हॉटेल आणि लॉज सुरु केले जाणार असल्याबाबतचे आदेश जारी केले. पण सध्या तरी कंटेन्मेंट झोनमध्ये हॉटेल आणि लॉज सुरु करता येणार नाही, असे यात नमूद करण्यात आले आहे.

8 जुलैपासून लॉज, गेस्ट हाऊस अशा सुविधा पुरवणारी कंटेन्मेंट झोनबाहेरील हॉटेल्स 33 टक्के क्षमतेसह चालवण्याची परवानगी देण्यात आली आहे. या संस्था जर क्वारंटाईन सेंटर म्हणून वापरात असल्यास त्या महापालिका किंवा जिल्हा प्रशासनाच्या पुढील आदेशापर्यंत क्वारंटाईन सुविधेसाठीच वापरल्या जातील किंवा त्यांचा उर्वरित भाग (67 टक्के) महापालिका किंवा जिल्हा प्रशासनाकडून क्वारंटाईन सेंटर म्हणून वापरला जाऊ शकतो, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

सर्व हॉटेल-लॉज मालकांना करावी लागणार पुढील गोष्टींची व्यवस्था

  • कोरोनापासून बचावासाठी उपाययोजनांची माहिती देणारे फलक/पोस्टर/एव्ही मीडिया दर्शनी भागात लावावेत.
  • हॉटेल आणि पार्किंगसारख्या भागात गर्दीचे योग्यरित्या नियोजन करावे. रांगा किंवा आसन व्यवस्थेत सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी वर्तुळे आखावीत.
  • प्रवेशद्वाराजवळ थर्मल स्क्रीनिंग बंधनकारक. रिसेप्शन टेबलजवळ प्रोटेक्शन ग्लास आवश्यक
  • पायाने वापरता येणारी (पेडल ऑपरेटेड) हँड सॅनिटायझर मशीन रिसेप्शन, गेस्ट रुम, लॉबी इथे मोफत उपलब्ध करावीत.
  • फेस मास्क, फेस कव्हर, ग्लोव्हज या गोष्टी हॉटेल कर्मचारी आणि ग्राहक या दोघांसाठी उपलब्ध करावीत.
  • चेक इन आणि चेक आऊट करण्यासाठी QR कोड, ऑनलाईन फॉर्म, डिजिटल पेमेंट, ई-वॉलेट अशी विनासंपर्क वापरता येणारी प्रणाली ठेवावी.
  • सोशल डिस्टन्सिंग पाळून लिफ्टमधील व्यक्तींची संख्या मर्यादित ठेवावी.
  • एसी- सीपीडब्ल्यूडीच्या मार्गदर्शक सूचना पाळाव्यात. सर्व एअर कंडीशनचे तापमान 24 ते 30 अंश सेल्सिअस या मर्यादेत असावे. आर्द्रता 40 ते 70 टक्के राखावी. ताजी हवा खेळती राहावी यासाठी क्रॉस व्हेंटिलेशन उत्तम असावे.

ग्राहकांसाठी सूचना

  • कोरोनाची लक्षणे नसलेल्या व्यक्तींनाच प्रवेश
  • फेस मास्क असल्यासच प्रवेश, हॉटेलमध्ये असताना संपूर्ण वेळ मास्क घालणे आवश्यक
  • प्रवाशांचे तपशील (प्रवासाचा इतिहास, वैद्यकीय स्थिती) आणि ओळखपत्र रिसेप्शनवर देणे बंधनकारक
  • आरोग्य सेतू अ‍ॅप वापरण्याची ग्राहकांना सक्ती
  • हाऊसकीपिंग सुविधा कमीत कमी वापरण्यावर ग्राहकांनी भर द्यावा.

Leave a Comment