या तारखेपासून सुरु होऊ शकतात राज्यातील हॉटेल्स; पण पाळावे लागतील हे नियम


मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच राज्यातील हॉटेल्स सुरु होण्याचे संकेत दिले होते. अशात आता महाराष्ट्रातील हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स ८ जुलैपासून सुरु होऊ शकतात. महाराष्ट्रातील हॉटेल्स लवकरात लवकर सुरु करण्यात येतील असे स्पष्ट करण्यात आले होते. त्याचबरोबर ही तारीख ८ जुलै देखील असू शकते.

दरम्यान ८ जुलैपासून रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्स सुरु झाली तर आस्थपनेच्या मालकांना नियमांचे पालन मात्र करावेच लागणार आहे. १ लाख ५० हजारांच्या घरात महाराष्ट्रातील हॉटेल्स आहेत तर ६५ हजार रेस्टॉरंट्स आहेत. ज्यामध्ये लाखो कर्मचारी काम करतात. या संदर्भातील वृत्त टाईम्स नाऊने दिले आहे. हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स सुरु झाल्याने अर्थव्यवस्थेलाही हातभार लागू शकतो.

दरम्यान मिशन बिगीन अगेनच्या अंतर्गत हॉटेल्स १०० टक्के सुरु करता येणार नाही. पण टप्प्याटप्प्याने सगळी काळजी घेऊन नियोजन केले जाईल, असे मुख्य सचिव संजीव कुमार यांनी काल झालेल्या बैठकीत स्पष्ट केलं. तर मिशन बिगीन अंतर्गत राज्यात अनेक उद्योग आणि व्यवसाय सुरु करण्यात आले आहेत. अशात हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स सुरु करण्याबाबत लवकरच निर्णय होईल, असे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारीच दिले होते. अशात आता ८ जुलैपासून मर्यादित स्वरुपात हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स सुरु होण्याची शक्यता आहे.

हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स सुरु करण्याआधी जाणून घ्या काय आहेत नियम

  • हॉटेलची जी क्षमता आहे त्याच्या ३३ टक्के पाहुण्यांना संमती दिली जाऊ शकते.
  • रेस्टॉरंट्समध्येही फक्त राहण्यासाठी संमती देण्यात आलेली आहे
  • रेस्टॉरंट्समधून अन्न देता येईल का? याबाबत अद्याप निर्णय होणे बाकी आहे
  • ज्यावेळी ग्राहक येतील तेव्हा थर्मोमीटरने तापमान तपासणे गरजेचे आहे.
  • रिसेप्शन टेबलवर स्क्रिनिंग करणे सक्तीचे असणार आहे
  • सॅनेटायझरच्या वापरासाठी सक्ती करण्यात आली आहे.
  • हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समध्ये असलेले गेमिंग झोन, स्विमिंग पूल, जिम हे बंदच राहणार आहेत
  • जे ग्राहक हॉटेल्समध्ये राहण्यासाठी येतील त्यांना मास्क वापरणे अनिवार्य असणार आहे.

Leave a Comment