अखेर सुशांतच्या ‘दिल बेचारा’चा ट्रेलर रिलीज


अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या ‘दिल बेचारा’ या अखेरच्या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. हा चित्रपट कोरोनामुळे थिएटरऐवजी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल. सुशांतच्या चित्रपटाचा ट्रेलर डिस्ने प्लस हॉटस्टार या अॅपवर रिलीज करण्यात आला आहे. सुशांतचा अखेरचा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहून त्याला श्रद्धांजली द्यावी, अशी त्याच्या चाहत्यांची इच्छा होती. पण कोरोनाच्या संकटामुळे हे शक्य झाले नाही.

सुशांतसोबत या चित्रपटात संजना सांघी मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाद्वारे तिने सिनेसृष्टीत पदार्पण केले असून दिग्दर्शक मुकेश छाब्रा याचाही हा पहिलाच चित्रपट आहे. खरंतर हा चित्रपट नोव्हेंबर महिन्यात प्रदर्शित होणार होता. परंतु काही कारणांमुळे तो लांबणीवर पडला. आता हा चित्रपट 24 जुलै रोजी डिस्ने प्लस हॉटस्टार ओटीटी प्लॅटफार्मवर िलीज होणार आहे. या चित्रपटाला ए. आर. रहमान यांनी संगीत दिले आहे.

हॉलिवूडच्या ‘द फॉल्ट इन अवर स्टार्स’ या चित्रपटाचा ‘दिल बेचारा’ हा रिमेक असल्याचे म्हटले जात आहे. ही कहाणी कॅन्सरग्रस्त जोडप्याची आहे. आपला शेवट आनंदी नसणार हे माहित असूनही ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात. दरम्यान ट्रेलर रिलीज होण्याच्या काहीतास आधीच ट्विटरवर #DilBecharaTrailer हा हॅशटॅग ट्रेण्ड होत आहे. सुशांतच्या नजरा या ट्रेलरकडे लागून राहिल्या होत्या. आज सगळे रेकॉर्ड मोडायचे असा इरादा सुशांतचे चाहते बोलून दाखवत आहेत.

Loading RSS Feed

Leave a Comment