घराबाहेर पडणार असाल तर आवश्यक कागदपत्रे जवळ बाळगा, अन्यथा…


मुंबई – मुंबई शहराला असलेला कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस अजूनच घट्ट होत चालला असून, मुंबईतील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत देखील धक्कादायक वाढ होत आहे. अशा अशा परिस्थितीत सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्याचे महत्व जास्तच वाढणार आहे. त्यातच आता कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्यांना ओळखपत्र व आवश्यक कागदपत्रे ठेवण्याची सूचना मुंबई पोलिसांकडून करण्यात आली आहे. आवश्यक कागदपत्रे न बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

दरम्यान सरकारकडून नुकतीच दोन किलोमीटरच्या परिसरातच प्रवास करण्याची अट मागे घेण्यात आली आहे. पण घरातून बाहेर सार्वजनिक ठिकाणी किंवा कामासाठी प्रवास करताना आता ओळखपत्र सोबत ठेवावे लागणार आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. दरम्यान सध्या अनलॉक सुरू असताना लोकांचा सार्वजनिक ठिकाणचा वावर बराचसा वाढला आहे. दररोज नवीन नियम कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लागू केले जात असताना, आता प्रशासनाकडून या नव्या नियमाचीही अमंलबजावणी केली जाणार आहे.

Leave a Comment