अजय देवगणची मोठी घोषणा, गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या जवानांवर बनवणार चित्रपट

अभिनेता आणि निर्माता अजय देवगण लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत-चीन सैनिकांमधील संघर्षावर चित्रपट बनवणार असल्याची माहिती समोर आली आहे. या चित्रपटात चीनी सैन्यासोबत लढताना शहीद झालेल्या 20 जवानांच्या बलिदानाविषयी ही कथा असेल. अद्याप चित्रपटाचे नाव आणि कलाकार निश्चित झालेले नाही. अजय देवगण या चित्रपटाची निर्मिती करणार आहे की यात प्रमुख भूमिका साकारणार आहे याची माहिती देखील अद्याप समोर आलेली नाही.

फिल्म क्रिटिक आणि ट्रेंड एनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्विट करत या संदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी ट्विट केले की, अजय देवगण गलवान खोऱ्यातील वादावर चित्रपट बनवणार आहे. चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही.  चित्रपटात 20 भारतीय सैन्य जवानांच्या बलिदानाला दाखवले जाईल, ज्यांनी चीनी सैन्याशी सामना केला. चित्रपटातील कलाकार अद्याप निश्चित झालेले नाहीत.

या चित्रपटाचे प्रोड्युसर अजय देवगण एफफिल्म्स आणि सेलेक्ट मीडिया होल्डिंग्स एलएलपी प्रोडक्शन कंपनी असेल. दरम्यान, अजय देवगणचा आगामी चित्रपट ‘भुजः द प्राइड ऑफ इंडिया’ हा चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

Leave a Comment