व्हायरल होत आहे ‘पवित्र रिश्ता’मधील रिलीज होऊ न शकलेले खास गाणे


अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे यांच्याकडे एकेकाळी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि सर्वाधिक चर्चेतील जोडी म्हणून पाहिले जायचे. हे दोघे ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांची लव्हस्टोरी सुरु झाली होती. प्रेक्षकांनीदेखील या दोघांवर भरभरून प्रेम केल्यामुळेच ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतील त्यांचे प्रत्येक सीन, त्याचे टायटल साँग आणि या दोघांवर चित्रित करण्यात आलेली गाणं विशेष गाजली.

दरम्यान या मालिकेसाठी या दोघांवर एक खास गाणे चित्रित करण्यात आले होते. पण ते गाणे त्यावेळी प्रदर्शित करता आले नाही. पण आता हे गाणे सुशांतच्या आत्महत्येनंतर रिलीज करण्यात आले असून ते सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर सध्या ‘जैसी हो वैसी रहो’ हे गाणे तुफान लोकप्रिय ठरत आहे. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत अंकिता-सुशांतवर हे गाणे चित्रित करण्यात आले होते. पण ते गाणे त्यावेळी रिलीज करण्यात आले नव्हते. पण सुशांतच्या निधनानंतर त्याच्या चाहत्यांना सुशांतची एक आठवण म्हणून हे गाणे रिलीज करण्यात आले आहे.

Leave a Comment