कोरोना : येथे चक्क टेडी बियर लोकांना करायला लावत आहे सोशल डिस्टेंसिंगचे पालन - Majha Paper

कोरोना : येथे चक्क टेडी बियर लोकांना करायला लावत आहे सोशल डिस्टेंसिंगचे पालन

कोरोनाग्रस्तांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत चालली असली तरी आता जगभरात अर्थव्यवस्था पुर्वपदावर आणण्यासाठी दुकाने, मॉल्स, हॉटेल उघडण्यास सुरुवात झाली आहे. या काळात सोशल डिस्टेंसिंगचे पालन करणे अतिशय गरजेचे आहे. महामारीच्या काळात सोशल डिस्टेंसिंग एवढे गरजेचे आहे की आता हॉटेल्स मालक, दुकानदार देखील आपल्या ग्राहकांनी नियमांचे पालन करण्यासाठी भन्नाट कल्पना लढवत आहे.

पॅरिसमधील एका कॅफेचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात चक्क मोठमोठे टेडी बियर ग्राहकांसोबत बसले आहेत. कॅफे मालकाने असे ग्राहकांमध्ये सोशल डिस्टेंसिंग राहावे यासाठी केले आहे.

ट्विटर युजर @LorenzoTheCat ने हे फोटो शेअर केले आहेत. त्याने फोटो शेअर करत लिहिले की, पॅरिसमधील एका कॅफेमध्ये टेडी बियर सोशल डिस्टेंसिंगचे पालन करण्यास सांगत आहे.

सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल होत आहे. ग्राहकांमध्ये सोशल डिस्टेंसिंग राहावे यासाठी वापरण्यात आलेल्या या कल्पनेचे नेटकऱ्यांनी देखील कौतुक केले.

Leave a Comment