शरद पवार आणि पडळकर त्यांचे ते बघून घेतील; उदयनराजेंची प्रतिक्रिया


सातारा : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वादग्रस्त टीकेनंतर, विविध राजकीय पक्षातून प्रतिक्रिया आल्या. त्याचबरोबर पडळकर यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले माजी मंत्री मधुकर पिचड यांनीही निषेध केल्यानंतर आता राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.

उदयनराजे भोसले यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याबाबत बोलताना कोणी कोणाबद्दल काय बोलले हे त्यांनी मला विचारुन बोलले नाहीत. मी परखडपणे माझे मत मांडत असतो. शरद पवार आणि पडळकर त्यांचे ते बघून घेतील, असे म्हटले आहे. ज्यांनी कुणावर टीका केली, त्याच्यावर त्यांना त्यांना विचारा. माझे मत मी परखडपणे मांडत असतो. ते जे कोणी बोलले ते मला विचारुन बोलले नाहीत. जे कुणी उत्तर देणार आहेत, ते मला विचारुन देणार नाहीत, असे उदयनराजेंनी म्हटले आहे.

आज साताऱ्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेत जाऊन त्याचे बंधू आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी सदिच्छा भेट घेतली. या भेटीनंतर उदयनराजेंनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी कोरोना परिस्थितीवरही त्यांनी भाष्य केले. साताऱ्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्याबाबत विचारले असता, कोरोनाचा उगाच बाऊ केला जात असल्याचे उदयनराजे म्हणाले.

Leave a Comment