हॉटस्टारवर रिलीज होणार बॉलीवूडचे 7 बिग बजेट चित्रपट


देशावर ओढावलेल्या कोरोनाच्या संकटामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू आहे. पण तरी देखील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत सातत्याने मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यामुळे देशातील अनेक उद्योगधंदे जवळपास साडेतीन महिन्यांपासून ठप्प पडले आहेत. त्याचबरोबर याला सिनेसृष्टी देखील अपवाद ठरलेली नाही. पण काही तयार असलेल्या चित्रपटांच्या निर्मात्यांनी होणारे नुकसान टाळण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचा मार्ग अवलंबला आहे. त्यातच काल हॉटस्टार लाइव्हच्या माध्यमातून मोठी घोषणा करण्यात आली.

हिंदीतील ७ बडे चित्रपट हॉटस्टार लाइव्हच्या माध्यमातून थेट ऑनलाईन रिलीज करणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. यावेळी अक्षय कुमार, अजय देवगण, आलिया भट, वरुन धवन, वाॅल्ट डिस्नी कंपनीचे चेअरमन उदय शंकर लाइव्हच्या माध्यमातून उपस्थित होते.


अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’, अजय देवगणचा बहुप्रतिक्षीत ‘भुज द प्राइड ऑफ इंडिया’, आलिया भटचा ‘सडक 2’, अभिषेक बच्चनचा ‘द बिग बुल’ खेमूचा ‘लूट केस’ आणि विद्युत जामवालचा ‘खुदा हाफिज’ असे सात चित्रपट हॉटस्टारवर रिलीज होणार आहेत. या सर्व चित्रपटांच्या रिलीजची घोषणा करताना त्यांचे पोस्टरदेखील रिलीज करण्यात आले.

यावेळी भारतातील डिस्ने इंडिया प्रमुख उदय शंकर यांनी सांगितले की, हे सात चित्रपट २४ जुलैपासून ऑक्टोबरपर्यंत थेट ओटीटीवर रिलीज होणार आहेत. हॉटस्टारवर रिलीज होणारा ‘दिल बेचारा’ हा पहिला चित्रपट असून, या चित्रपटाच्या माध्यमातून सुशांतला श्रद्धांजली वाहण्यात येईल.

Leave a Comment