1 ते 11 जुलैदरम्यान ठाण्यात महापालिकेचा कडकडीत लॉकडाऊन


ठाणे : देशात कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीत सातत्याने मोठ्या प्रमाणात वाढ होत असून कोरोनाचे केंद्रबिंदू ठरलेल्या मुंबईसह ठाण्यातही कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे राज्यातील लॉकडाउन राज्य सरकारकडून 31 जुलैपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यानंतर आता ठाणे महानगरपालिकेनेही संपूर्ण ठाण्यात 1 ते 11 जुलै या कालावधीत कडकडीत लॉकडाउन जाहीर केला आहे.

11 जुलैपर्यंत ठाणे महापालिकेच्या हद्दीत लॉकडाउनची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. फक्त अत्यावश्यक सेवा म्हणून मेडिकल आणि दुध डेअरी सुरू राहणार आहे. तर महाराष्ट्रातही लॉकडाउन 31 जुलैपर्यंत वाढविण्यात आला आहे. सध्या जे नियम आहेत त्यात फारसा बदल करण्यात आलेला नाही. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. रविवारच्या संवादात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याचे संकेत दिले होते. एमएमआरडीए परिसरात केवळ अत्यावश्यक सेवेतील लोकांना तसेच कार्यालयात जाणाऱ्यांनाच दूरचा प्रवास करता येणार आहे. शॉपिंगसाठी जवळच्या मार्केटपर्यंत जाता येईल, दूर जाता येणार नाही.

Leave a Comment