ई-पास मागितला म्हणून माजी खासदाराने चक्क केली पोलिसाला मारहाण

कोरोना व्हायरस महामारी संकटाच्या काळात पोलीस दिवस-रात्र काम करत आहे. या काळात पोलिसांवर हल्ले झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. आता तामिळनाडूमधील एका माजी खासदाराचा पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत असून, ई-पास मागितल्यामुळे ही घटना घडली.

तामिळनाडूचे माजी खासदार आणि डीएमके पक्षाचे नेते के अर्जुनन गाडीतून जात असताना, ड्यूटीवर तैनात पोलीस कर्मचाऱ्याने सलेम चेक पोस्टजवळ त्यांची गाडी थांबवली. लॉकडाऊनच्या काळात आवश्यक असल्याने पोलीस कर्मचाऱ्याने त्यांना ई-पास दाखविण्याची मागणी केली असता, के अर्जुनन भडकले. यानंतर त्यांनी कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करण्यास सुरूवात केली.

के अर्जुनन यांनी दादागिरी करण्यास सुरुवात केल्यावर पोलीस कर्मचाऱ्याने देखील त्यांना धक्का दिला. यानंतर त्यांनी कर्मचाऱ्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. घटनास्थळी असलेल्या इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी यावेळी मध्यस्थी केली.

Leave a Comment