सोशल मीडियात व्हायरल होत आहे शेतकरी झालेल्या धोनीचा व्हिडीओ


मुंबई : सध्या सोशल मीडियावर भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार कॅप्टन कुल अर्थात महेंद्र सिंह धोनीचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. धोनी या व्हिडीओमध्ये शेतात ट्रॅक्टर चालवताना दिसत आहे. त्याचबरोबर तो सेंद्रिय शेती करत असल्याचे म्हटले जात आहे.

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर क्रिकेटसह इतर खेळांचे आयोजन ठप्प पडले आहे. त्याचबरोबर क्रिकेटचा महाकुंभ अशी ओळख असलेली आयपीएल स्पर्धाही अनिश्चितकाळासाठी स्थगित करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत क्रिकेट विश्वातील दिग्गज खेळाडू आपापल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत. तर महेंद्रसिंह धोनी सध्या शेती करण्यात मग्न आहे.


लॉकडाऊनपासूनच रांचीमध्ये आयपीएलमधील चेन्नई सुपरकिंग्ज या संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी आपल्या कुटुंबासोबत आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने फार्म हाऊसमध्ये शेती करण्यासाठी एक ट्रॅक्टर खरेदी केला होता. आता याच ट्रॅक्टरचा वापर तो सेंद्रिय शेतीसाठी करत आहे.

‘धोनी भक्त’ नावाच्या इन्स्टाग्रामवरील अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. धोनी व्हिडीओमध्ये एकटा ट्रॅक्टर चालवताना दिसत आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये सेंद्रिय शेतीची मजा लुटताना माही भाईचा एक्स्लूझिव्ह व्हिडीओ, असे लिहिले आहे. महिंद्राचा स्वराज 963 एफई ट्रॅक्टर धोनीने खरेदी केली होता, याची किंमत आठ लाखांच्या घरात आहे. सोशल मीडियावर धोनीच्या हा व्हिडीओला फारच पसंती मिळत आहे आणि चाहते सातत्याने कमेंट्स करत आहेत.

Loading RSS Feed

Leave a Comment