रोबॉटची कमाल, 530 कोटींच्या चित्रपटात साकारणार प्रमुख भूमिका

रोबॉट झपाट्याने मनुष्याची जागा घेत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. सध्या विविध कामांसाठी रोबॉटचा वापर केला जातो. मात्र आता एक रोबॉट चक्क चित्रपटात अभिनय करणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेंट ह्यूमनॉइड रोबॉट एरिका हॉलिवूड चित्रपट ‘बी’ मध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहे. या सायन्स-फिक्शन चित्रपटाचे बजेट 70 मिलियन डॉलर्स (जवळपास 530 कोटी रुपये) आहे. एरिका दिसायला अगदी मनुष्याप्रमाणे आहे. चित्रपटात ती जेनेटिकली मॉडिफाइड सुपरह्यूमनची भूमिका साकारणार आहे. एरिकाने या चित्रपटासाठी आपला पहिला सीन मागील वर्षी जूनमध्ये शूट केला होता. बाकी चित्रपटाचे पुढील वर्षी शूटिंग होणार आहे.

Image Credited – navbharattimes

एआय पॉवर्ड एरिका 23 वर्षांच्या महिलेसारखी दिसते. एरिका स्वतः चालू शकत नाही, मात्र मान फिरवू शकते, छोटेसे भाषण देऊ शकते आणि इंफ्रारेड सेंसर्सच्या मदतीने लोकांची ओळख पटवू शकते. एरिकाला या रोलसाठी तयार करण्यास मेकर्स खूप मेहनत घ्यावी लागली. अनेक ट्रेनिंग सेशन देखील घ्यावे लागले.

Image Credited – navbharattimes

एरिकाला 2015 मध्ये सर्वांसमोर सादर करण्यात आले होते. या रोबॉटला जपानच्या ओसाका यूनिव्हर्सिटीचे रोबॉट सायंटिस्ट हिरॉशी इशिगूरो यांनी तयार केले आहे.

Leave a Comment