सुशांतने ‘त्या’ दिवशी दोनदा केला होता आत्महत्येचा प्रयत्न!


मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरात अभिनेता सुशांत सिंह राजपूतने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येमुळे सिनेसृष्टीला एकच धक्का लागला. दरम्यान आता सुशांत सिंह राजपूत याच्या शवविच्छेदनाचा अहवाल समोर आला असून त्यामध्ये गळफास घेतल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पण सुशांतने आत्महत्या का केली या मागचे कारण अद्याप समोर आलेले नाही. दरम्यान या प्रकरणाचा विविध अँगल्सने मुंबई पोलीस तपास करत आहेत.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर त्याचे बरेच चाहते त्याच्या कुटुंबीयांना आधार देत आहेत. यावेळी अनेक चाहत्यांनी असा दावा आहे की सुशांत सिंह राजपूत आत्महत्या करू शकत नाही, पण त्याच्यासोबत काहीतरी भयंकर घडले असणार म्हणून त्याने असे पाऊल उचलले असणार आहे. पण मुंबई पोलीस आणि वैद्यकीय अहवालानुसार, ही आत्महत्याच असल्याचे स्पष्ट झाले आहे.


दरम्यान, सुशांतच्या मृत्यूबद्दल आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. यासंदर्भात टीव्ही 9 या वृत्त वाहिनीच्या एका न्यूज अँकरने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये मुंबई पोलिसांच्या तपासानुसार, सुशांतने २ वेळा आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे म्हटले आहे. त्याने सुरुवातीला बाथरोबच्या बेल्टने गळफास घेण्याचा प्रयत्न केला पण बेल्ट तेवढे वजन पेलू न शकल्यामुळे तो तुटला. त्यानंतर सुशांत सिंह राजपूतने त्याच्या कपाटात ठेवलेल्या कपड्यांपैकी एक कुर्ता काढला आणि त्याने गळफास घेतला.

सुशांत सिंह राजपूत याने १४ जून रोजी त्याच्या मुंबईतील राहत्या घरात आत्महत्या केली होती. त्यावेळी प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न आला की, सुशांतने असे टोकाचे पाऊल का उचलले? या प्रकरणी मुंबई पोलीस सातत्याने तपास करत आहे. आतापर्यंत पोलिसांनी एकूण २७ जणांचा जबाब नोंदवला आहे. शनिवारी पोलिसांनी सांगितले की, ते प्रत्येक गोष्ट पडताळून त्या दिशेने या प्रकरणाचा तपास करत आहेत.


याबाबत आणखी माहिती देताना डीसीपी (झोन-९) अभिषेक त्रिमुखे म्हणाले की, सुशांतचा सविस्तर पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला असून त्याच्या मृत्यूचे कारण डॉक्टरांनी गळफास असल्याचेच घोषित केले आहे. याशिवाय इतर जे नमुने घेण्यात आले आहेत. ते देखील विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत. सुशांतने आत्महत्या का केली याविषयी पोलिस सर्व बाजूने तपास करत आहेत. ते पुढे म्हणाले की, चौकशीत काहीही उघड होताच त्याबाबत पोलीस तुम्हाला नक्कीच सांगतील. मी तुम्हाला खात्री देतो की, हे प्रकरण मुंबई पोलीस अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळत आहेत. आपण पोलिसांवर विश्वास ठेवा, जे काही सत्य असेल ते लवकरच समोर येईल.

Leave a Comment