शिवसेना भवनाला कोरोनाचा विळखा, आणखी 3 जण बाधित


मुंबई : राज्यावर ओढावलेल्या कोरोनाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढतच असून काल मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या कृष्णकुंज या निवासस्थानातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता राज्यातील सत्ताधारी असलेल्या शिवसेनाच्या मुख्य कार्यालयातील म्हणजेच शिवसेना भवनातील आणखी तीन जणांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच शिवसेना भवनातील काम करणाऱ्यांना कोरोना झाल्याची बातमी समोर आली होती, त्यानंतर सेनाभवन सॅनिटायझेशन करुन सील करण्यात आले होते. पण तरी देखील आता शिवसेना भवनातील आणखी 3 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार 19 जूनला शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सेना भवनात गेले होते. तिथे कोरोना झालेले तीनही जण उपस्थित होते. त्यांच्यासोबत त्यावेळी दिवाकर रावते, संजय राऊत, किशोरी पेडणेकर, विशाखा राऊत हे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यामुळे या सर्वांची कोरोना चाचणी करवी लागणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Leave a Comment