सुष्मिताच्या वेब सिरीजवर प्रतिक्रिया दिल्यामुळे ट्रोल झाला सलमान


बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनची ‘आर्या’ ही वेब सिरीज काही दिवसांपूर्वी रिलीज झाली होती. या सिरीजमधून सुष्मिताने पुनरागमन केले आहे. तसेच सुष्मिताने आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा थोडी वेगळी भूमिका या सिरीजमध्ये साकारली आहे. दरम्यान सुष्मिताला अभिनेता सलमान खानने ट्विट करत पाठिंबा दिला होता. पण त्याला या ट्विटनंतर सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले.


५५ सेकंदाचा एक व्हिडीओ सलमानने ट्विटमध्ये पोस्ट केला आहे. त्याने लोकांना या व्हिडीओमध्ये ही सिरीज पाहण्यासाठी आवाहन केले आहे. आर्याचे स्वागत तर करा… एकमद वेगळ्या प्रकारे कमबॅक केले आहे आणि शो देखील वेगळा आहे. सुष्मिता सेन तुझे अभिनंदन, असे आपल्या ट्विटमध्ये सलमानने म्हटले आहे.

पण सलमानचे हे ट्विट नेटकऱ्यांच्या पचनी पडले नाही आणि त्याला ट्रोल करण्यास त्यांनी सुरुवात केली. सलमानला ट्रोल करत नेटकऱ्यांनी चांगलेच सुनावले आहे. सोशल मीडियावर अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर घराणेशाही हा वाद सुरु झाला असल्यामुळे चित्रपट निर्माता करण जोहर, आलिया भट्ट, एकता कपूर, सलमान खान यांच्यावर नेटकऱ्यांनी निशाणा साधला आहे.

Leave a Comment