ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवलीत पुन्हा एकदा लॉकडाउन !


मुंबई – ठाणे जिल्ह्यातील लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर जिल्ह्यातील काही भागात जीवघेण्या कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा आपला रंग दाखवण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे स्थानिक प्रशासनाची डोकेदुखी वाढत असल्यामुळे ठाणे, नवी मुंबई, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर या महानगर पालिका क्षेत्रातील कोरोनाग्रस्तांची ज्या विभागात संख्या वाढत त्याठिकाणी पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात येणार असल्याची माहिती ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. हा निर्णय नागरिकांच्या हितासाठी घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे, त्याचबरोबर जे भाग हॉटस्पॉट म्हणून नव्याने समोर येत आहेत, त्याभागांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला, त्यावेळी बोलताना ठाकरे यांनी राज्यावर ओढावलेले कोरोनाचे संकट अद्याप दूर झाले नाही. कोरोनाविरोधात आपल्याला अजून लढा द्यायचा आहे. पण कोरोनाला स्वत:हून बळी पडू नका, असे म्हणत लॉकडाउन उठवण्यात येणार नाही, असे स्पष्ट केले आहे. परंतु, ज्या भागात कोरोनाची परिस्थितीत हाताबाहेर जाईल, अशा भागात कठोर लॉकडाउन लागू करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. राज्य अनलॉक होत असताना अनेक दुकाने आणि व्यवसाय सुरू होत आहे. पण त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता कोणीही बाहेर पडून नका, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.

Leave a Comment