पडळकरांच्या वादग्रस्त वक्तव्यावर शरद पवारांनी दिली प्रतिक्रिया

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आक्षेपार्ह टीका केली होती. पडळकर यांच्या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधात आंदोलन देखील केली होती. आता शरद पवार यांनी स्वतः पडळकर यांनी केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया दिली आहे. गोपीचंद पडळकरांना काही महत्व देण्याची गरज नाही, त्यांचे अनेकवेळा डिपॉझिट जप्त झाले आहे, कशाला बोलायचे, असे पवार म्हणाले. ते सातारा दौऱ्यावर असताना बोलत होते.

पडळकरांवर पवार म्हणाले की, गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याची नोंद घ्यावी असे त्यांचे काही काम नाही. सांगली लोकसभा निवडणुकीत पराभव व बारामती विधानसभा निवडणुकीत त्यांचे डिपॉझिट जप्त झाले. त्यामुळे लोकांनी स्वतःहून त्यांना बाजूला केले असल्याचे दिसून येते. अशा माणसाची कशाला आपण नोंद घ्यावी.

दरम्यान, भाजप आमदार असलेल्या गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांवर खालच्या पातळीवर टीका केली होती. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावर बोलताना त्यांनी शरद पवार हे लागलेले कोरोना असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरून पडळकर यांच्याविरोधात गुन्हा देखील दाखल झाला आहे.

Leave a Comment