… म्हणून स्वतः गटारात उतरुन भाजप नगरसेवकाने केली सफाई

सर्वसाधारणपणे शहरात अथवा इतर ठिकाणी ड्रेनेजच्या मॅनहोलची सफाई करण्यासाठी कामगारांना बोलवले जाते. मात्र कर्नाटकच्या मंगळुरू शहरातील एका नगरसेवकाने जे केले, त्यासाठी त्यांचे सोशल मीडियावर भरभरून कौतुक होत आहे. पावसामुळे शहरातील रस्त्यावर पाणी साठले होते. अशा स्थितीमध्ये पाणी जाण्यासाठी ड्रेनज लाईनची सफाई करण्याची गरज होती. याची तक्रार मिळताच तेथील नगरसेवक मनोहर शेट्टी स्वतः तेथे पोहचले. मात्र कर्मचाऱ्यांनी सफाई करण्यास नकार दिल्यानंतर, ते स्वतः ड्रेनेजच्या मॅनहोलमध्ये उतरले. ड्रेनेजमध्ये उतरण्याचे त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांच्या या कामाचे नेटकरी कौतुक करत आहेत.

मनोहर शेट्टी हे मंगळुरू येथील कादरी दक्षिणी वॉर्डचे भाजपचे नगरसेवक आहेत. ड्रेनेजची सफाई न केल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर थुंबले होते. कामगारांनी देखील मॅनहोलमध्ये उतरण्यास नकार दिला. अशा स्थितीमध्ये नगरसेवक मनोहर शेट्टी यांनी कसालाही विचार न करता, स्वतः ड्रेनेजच्या मॅनहोलमध्ये उतरत सफाई केले. कोणीतरी त्यांचे फोटो सोशल मीडियावर टाकल्यानंतर व्हायरल झाले.

शेट्टी म्हणाले की, मी जेट ऑपरेटरला सांगितले की आत जाऊन कचऱ्याची सफाई करा. ज्याद्वारे पाईपलाईन स्वच्छ होईल. मात्र त्यांनी नकार दिला. त्यामुळे मी स्वतः मॅनहोलमध्ये उतरून सफाई करण्याचे ठरवले. मी आत गेल्यावर पक्षाचे 4 कार्यकर्ते देखील आत आले. त्यानंतर टॉर्चच्या मदतीने सफाई केली. यासाठी अर्धा दिवस गेला. व्हायरल झालेल्या फोटोविषयी ते म्हणाले की, हे काही लोकप्रियतेसाठी नाही केले. हे कामाचा भाग आहे. आम्ही निवडून दिलेले प्रतिनिधी आहोत, जर आम्ही कोणतेही काम लवकर करू शकतो तर ते करावे.

Leave a Comment