टिक-टॉक व्हिडीओसाठी बाळाला फेकले चक्क स्विमिंग पूलमध्ये, पुढे काय झाले बघा

टिक-टॉक व्हिडीओसाठी लोक काहीही करू शकतात हे आपण अनेकदा पाहिले आहे. स्वतःचे प्राण धोक्यात घालून लोक टिक-टॉक व्हिडीओ बनवतात. असाच एका चिमुकल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये 8 महिन्यांच्या बाळाला चक्क स्विमिंग पूलमध्ये पोहण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी फेकले आहे. अमेरिकेच्या कोलोराडो स्प्रिंग्स येथील क्रिस्टा मेयर यांनी काही महिन्यांपुर्वी मनोरंजनासाठी टिकटॉक डाउनलोड केले होते. मात्र त्यांचा एक व्हिडीओ आता लोकप्रिय झाला आहे. या व्हिडीओला 53 मिलियन पेक्षा अधिक वेळा पाहण्यात आले आहे.

https://www.tiktok.com/@mom.of.2.boyss/video/6840498059235921158

27 वर्षीय क्रिस्टा मेयर यांना 2 मुले आहेत. त्यांनी फेब्रुवारीमध्ये टिक-टॉकवर अकाउंट उघडले होते. त्यांनी आपला 8 महिन्यांचा मुलगा ओलिव्हरचा व्हिडीओ प्लॅटफॉर्मवर शेअर केल्यावर तुफान व्हायरल झाला.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की स्विमिंग प्रशिक्षकाद्वारे बाळाला पाण्यात फेकले जात आहे. चार दिवसांपुर्वी हा व्हिडीओ शेअर क्रिस्टा यांनी लिहिले की, ओलिव्हर प्रत्येक आठवड्याला मला हैराण करत आहे. मला विश्वास होत नाही की तो केवळ दोन महिन्यांचा आहे व एवढ्या वेगाने शिकत आहे. तो एक छोटासा मासा आहे.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. काही युजर्सनी बाळाला अशाप्रकारे प्रशिक्षण द्यायला हवे असे म्हटले, तर काही युजर्सनी चिमुकल्या ओलिव्हरबद्दल चिंता देखील व्यक्त केली.

Leave a Comment