या तारखेला रिलीज होणार सुशांतचा अखेरचा चित्रपट

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर त्याचे चाहते त्याचा अखेरचा चित्रपट ‘दिल बेचारा’ पाहण्यास उत्सुक आहेत. या चित्रपटाबाबत मोठी बातमी समोर आली असून, सुशांतचा अखेरचा चित्रपट थेएटरमध्ये रिलीज न होता थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. ‘दिल बेचारा’ हा चित्रपट येत्या 24 जुलै रोजी डिज्नी+ हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. हा चित्रपट सर्व स्बस्क्राइबर्स आणि नॉन-स्बस्क्राइबर्ससाठी उपलब्ध असेल.

सुशांतच्या शेवटच्या चित्रपटाची माहिती देताना डिज्नी+ हॉटस्टारने लिहिले की, एक प्रेम, आशा आणि कधीच न संपणाऱ्या आठवणींची कथा. 24 जुलै रोजी सर्वांसाठी ‘दिल बेचारा’ येत आहे. हा चित्रपट स्बस्क्राइबर्स आणि नॉन-स्बस्क्राइबर्स देखील पाहू शकतील. म्हणजेच हा चित्रपट सर्वजण मोफत पाहू शकतील.

सुशांतच्या मृत्यूच्या धक्कातून त्याचे चाहते अद्याप सावरलेले नाहीत. चाहते त्याच्या अखेरच्या चित्रपटाची अनेक दिवसांपासून वाट पाहत होते. चाहत्यांनी सुशांतच्या आठवणीत हा चित्रपट मोठ्या पडद्यावर रिलीज करण्याची देखील मागणी केली होती. मात्र आता ‘दिल बेचारा’ डिज्नी+ हॉटस्टार या प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

Leave a Comment