दिल्लीतील रामलीलांमध्ये पाच रुपयांसाठी गाणे गायचा सोनू निगम


टी-सिरीजचे मालक भूषण कुमार यांची पत्नी दिव्या खोसला कुमारने पुन्हा एकदा सोनू निगमवर टीका केली आहे. इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत तिने सोनू निगमच्या आरोपांना उत्तर दिले, जे नुकतेच सोनू निगमने भूषण कुमार यांच्यावर केले होते. दिव्या म्हणाली की आता तिला बलात्काराची धमकी दिली जात आहे.

या व्हिडिओत दिव्या खोसला कुमार असे म्हणताना दिसत आहे की गुलशन कुमारच्या मृत्यूनंतर भूषण कुमारने सोनू निगमची मदत घेतली. त्यावेळी भूषण खूपच लहान होता, पण सोनूने मदत करण्याऐवजी दुसर्‍या कंपनीशी करार केला होता. दिव्याने सोनूला विचारले की तुझे अबू सालेमशी संबंध आहेत का?


दिव्या म्हणाली की सोनू निगमने आजवर आपल्याशिवाय इतर कोणत्याही गायकाला संधी दिली नाही. परंतु आज टी-सिरीजसोबत काम करणारे 97 टक्के लोक बाहेरचे आहेत. सोनू निगम दिल्लीतल्या रामलीला येथे पाच रुपयांसाठी गाणे गायचा. त्याच वेळी, गुलशन कुमार यांनी त्याची प्रतिभा ओळखली आणि त्याला संधी दिली. गुलशन कुमार यांच्या हत्येनंतर सोनू निगम दुसर्‍या कंपनीसोबत जोडला गेला. त्यावेळी भूषण कुमार हे 18 वर्षांचे होते आणि त्यांनी सोनू निगमची मदत घेतली होती आणि आज ते या व्हिडिओद्वारे कृतज्ञता व्यक्त करीत आहेत.

दिव्या पुढे म्हणाली की सोनू निगमने आपल्या व्हिडिओमध्ये म्हटले होते की मीटूच्या माध्यमातून एका मुलीने भूषण कुमारवर आरोप केले आहेत. मीटू ही खूप चांगली चळवळ होती परंतु बर्‍याच लोकांनी त्याचा गैरफायदा घेतला. त्यावेळी आमच्यावर असे आणखी बरेच आरोप करण्यात आले होते, परंतु आम्ही पोलिसांची मदत घेतली. बर्‍याच मुलींचा असा विश्वास होता की त्यांनी दुसर्‍याच्या सांगण्यावरून असे केले आहे. आज सोनू निगमही याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करीत आहे.

दिव्या म्हणाली की सोनू निगमचा व्हिडिओ समोर आल्यानंतर बर्‍याच मुलींनी आम्हाला पुन्हा ब्लॅकमेल करायला सुरुवात केली आहे. त्या म्हणत आहेत की एकतर आम्हाला काम आणि पैसे द्या नाहीतर आम्ही तुमच्यावर आरोप करु. आपण इतर कलाकारांसोबत घेऊन टी-सिरीज बंद करण्याचा प्रयत्न करत आहात. तुमच्या पत्नीने तुमच्यावर आरोप केले होते. दिव्या म्हणाली की माझ्या पती व मुलाला जिवे मारण्याची धमकी दिली जात आहे.

Leave a Comment