मनोरंजन क्षेत्रावर आणखी एक आघात; 16 वर्षीय TikTok स्टारने केली आत्महत्या


एका पाठोपाठ एक दु:खद वृत्त मनोरंजन क्षेत्रातून समोर येत आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या 10 दिवसांनंतर सुप्रसिद्ध टीक-टॉक स्टार सिया कक्कड हिने आत्महत्या केली असून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल सियाने का उचलले, याबाबतची माहिती अद्याप समोर आली नाही. दरम्यान, मुंबई पोलीस सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्ये प्रकरणी तपास करत असतानाच सिया कक्कड हिने आत्महत्या केल्यानंतर मनोरंजन क्षेत्रावर आणखी एक आघात झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.


याबाबत माहिती देताना टीक-टॉक स्टारच्या मॅनेजर अर्जुन सरीनने सांगितले की, एका व्हिडिओच्या कोल्याबरेशनवरून बुधवारी रात्री सियाशी त्याचे बोलणे झाले होते. सिया त्यावेळी अगदी व्यवस्थित बोलत होती. त्याचबरोबर ती आत्महत्या करेल असे, वाटत नव्हते. पण त्यानंतर तिच्या आत्महत्येचे अचानक वृत्त समजले. याबाबत फोटोग्राफर विरल भयानी याने एक पोस्ट केली आहे. पोस्टनुसार, सियाचा मॅनेजर अर्जुन सरीन यांच्याशी विरल याने संवाद साधला असता, अर्जुन आणि सरिन यांच्यात बुधवारी रात्री एक गाण्याच्या संदर्भात शेवटचे बोलणे झाले होते. तेव्हा तिचा मूड चांगला होता.

आत्महत्या करण्यापूर्वी सियाने 19 तासांपूर्वी इंस्टाग्रामवर एक डान्स व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यात ती एका पंजाबी गाण्यावर थिरकताना दिसत आहे. सियाने तिच्या एका स्टोरीत डान्स व्हिडीओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला होता. सियाच्या आत्महत्येमुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. एवढ्या कमी वयात सियावर अशी काय वेळ आली होती की, तिला टोकाचे पाऊल उचलावे लागले, असा प्रश्न आता समोर आला आहे.

Leave a Comment