ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून स्थानिकांना नोकऱ्या देणार ठाकरे सरकार


मुंबई – महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्रात कामगार कमतरतेची पूर्तता करण्यासाठी राज्य सरकारने ऑनलाइन पोर्टल सुरू केले असून यामध्ये स्थानिक तरुणांना नोकरीच्या विविध ऑफर देण्यात आल्या आहेत. या पोर्टलमध्ये सरकारी नोकऱ्यांसोबतच खासगी कंपन्यांमध्येही नोकऱ्यांची तपशीलवार माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

याबाबत माहिती देताना राज्याचे कौशल्य विभाग मंत्री नवाब मलिक म्हणाले की, स्थानिक तरुणांना रोजगार मिळावा यासाठी कौशल्य विभागामार्फत rojgar.mahaswayam.gov.in or www.mahaswayam.gov.in हे ऑनलाईन पोर्टल सुरू करण्यात आले आहे. या पोर्टलवर उमेदवार आपल्या आवडीनुसार नोकरीसाठी नोंदणी करू शकतात. याद्वारे, बेरोजगार तरुणांना चांगली नोकरीची संधी मिळू शकते, त्याचबरोबर त्यांना राज्यातील कामगार कमतरता दूर करण्यातही यश मिळू शकेल.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. मनसेने अशी मागणी केली आहे की राज्यातील 80 टक्के रोजगार स्थानिक तरुणांना देण्यात यावा आणि इतर राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या लोकांची काटेकोरपणे नोंदणी करावी.

Leave a Comment