सोनू निगमच्या ‘त्या’ व्हिडीओला कुमार सानू यांनी देखील दिला पाठिंबा


बॉलिवूडमधील घराणेशाहीविरोधात पुन्हा एकदा अभिनेता सुशांतच्या आत्महत्येमुळे आवाज उठवला जात आहे. सोशल मीडियाद्वारे अनेक स्टार किड्सवर जोरदार टीका होत आहे. दरम्यान या मक्तेदारीवर गायक सोनू निगमने देखील बोट ठेवले होते. त्याचबरोबर सुशांतसारखीच आणखी काही तरुण कलाकार आत्महत्या करतील अशी भीती व्यक्त केली होती. आता सुप्रसिद्ध गायक कुमार सानू यांनी देखील त्याच्या या वक्तव्याचे समर्थन करत बॉलिवूडमध्येच सर्वाधिक घराणेशाही असल्याचे म्हटले आहे.

फेसबुकवर कुमार सानू यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यांनी या व्हिडीओद्वारे बॉलिवूडवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, सुशांत सिंह राजपूत एक उत्तम अभिनेता होता. त्याने खूप कमी कालावधीत यश संपादीत केले. अशा गुणी कलाकाराने आत्महत्या करणे दुदैवी आहे. खर तर सर्वच क्षेत्रांमध्ये घराणेशाही दिसते. परंतु त्याचा सर्वाधिक प्रभाव बॉलिवूडवर असल्याचे नाकारता येणार नाही अशा प्रतिकूल परिस्थितीत बॉलिवूडमध्ये करिअर करु इच्छिणाऱ्या नव्या कलाकारांनी सर्वप्रथम एखादी नोकरी करावी आणि त्यानंतर आपल्या स्वप्नांच्या दिशेने मार्गक्रमण करावे, असा सल्ला या व्हिडीओद्वारे नव्या कलाकारांना त्यांनी दिला आहे. सध्या सोशल मीडियावर त्यांचा हा व्हिडीओ चर्चेत आहे.

Loading RSS Feed

Leave a Comment