अरविंदा डिसिल्वांची ‘विश्वचषका’च्या त्या वादात उडी; बीसीसीआयने करावी या प्रकरणाची चौकशी


कोलंबो : श्रीलंकेचे माजी क्रीडामंत्री महिंदानंद अलुथगामगे यांनी २०११ साली मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेला विश्वचषकाचा अंतिम सामना फिक्स असल्याचा असा दावा केला. त्यांनी श्रीलंकेतील एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केलेल्या दाव्यानंतर क्रिकेट विश्वात एकच खळबळ उडाली.

महिंदानंद अलुथगामगे यांच्या दाव्यानंतर श्रीलंका क्रिकेट संघाचा माजी खेळाडू महेला जयवर्धने आणि तत्कालीन कर्णधार कुमार संगकारा यांनी आरोप फेटाळून लावले. माजी क्रीडामंत्र्यांनी यासोबतच सामन्यात शेवटच्या क्षणाला संघात मुद्दाम बदल करण्यात आले, असाही दावा केला होता. आता या प्रकरणी माजी कर्णधार आणि तत्कालीन मुख्य निवडकर्ते अरविंदा डिसिल्वा यांनी मत मांडले.

आयसीसी, बीसीसीआय आणि क्रिकेट श्रीलंकेने हा सामना फिक्स होता का? याचा तपास काही लोक खळबळजनक दावा करतात आणि खोटे बोलतात. पण त्यांचा खोटेपणा उघड पाडण्यासाठी करावा. सचिन तेंडुलकरसारख्या महान फलंदाजाने आपल्या कारकिर्दीतील एक विश्वचषक जिंकला. अशा प्रकारे त्याच विजेतेपदावर प्रश्न उपस्थित केल्याने त्याच्या प्रतिमेलादेखील तडा जाऊ शकतो. त्यामुळे किमान सचिन आणि त्याच्या असंख्य चाहत्यांसाठी तरी भारत सरकार आणि बीसीसीआयने या प्रकरणाची चौकशी करावी आणि तपासाला सुरुवात करावी, म्हणजे सत्य समोर येईल आणि खेळाला गालबोट लागणार नसल्याचे मत डिसिल्वा यांनी मांडले.

Leave a Comment