सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी कंगनाचा नवा आरोप


बॉलीवूडची क्वीन अर्थात कंगना राणावतने अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणी नवा आरोप केला असून याबाबत तिने आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला असून त्यात तिने सुशांत सिंह राजपूतने भावनिक, मानसिक लिंचिंग केले गेल्यामुळे आत्महत्येचे पाऊल उचलल्याचे म्हटले आहे. १४ जून रोजी मुंबईतील आपल्या वांद्रे येथील राहत्या घरी सुशांत सिंह राजपूत गळफास लावून घेत आत्महत्या केल्यामुळे सगळे बॉलिवूड हादरले आहे. त्यातच आता अशात कंगना राणावतने सुशांतचा बळी हा इमोशनल, सायकोलॉजिकल आणि मेन्टल लिंचिंगमुळे गेल्याचा आरोप केला आहे.

कंगनाने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओत सुशांतच्या हत्येनंतर अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. मी काही गोष्टी वाचल्या तर काही मी पाहिल्या आणि ऐकल्या आहेत. त्याच्यासोबत जे काही बॉलिवूडमध्ये घडत होते, तो त्यामुळे त्रस्त झाला होता, असे त्याच्या वडिलांनी एका मुलाखतीत सांगितले. सुशांतने अभिषेक कपूर या दिग्दर्शकासोबत केदारनाथ नावाचा चित्रपट केला होता. त्यांनी असे म्हटले आहे की सुशांतचे मानसिक आरोग्य हळूहळू बिघडवण्यात आले. तर सुशांतसोबत अंकिता लोखंडे जिने दीर्घकाळ काम केले तिने सामाजिक स्तरावर सुशांतचा झालेला अपमान आणि बदनामी तो सहन करु शकला नसल्याचे म्हटले आहे.


बॉलिवूडमधील या माफियांनी अत्यंत पद्धतशीरपणे सुशांतची बदनामी केली. त्याला त्याचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे वाळीत टाकण्याचा प्रकार सुरु केल्यामुळे सुशांत हळूहळू नैराश्याच्या गर्तेत ढकलला गेला. त्याच्याबद्दलच्या खोट्या बातम्याही अनेक सो कॉल्ड पत्रकारांनी पसरवल्याचे म्हणत कंगनाने काही वृत्तपत्रांच्या नावांचाही उल्लेख केला आहे.

त्याचबरोबर ब्लाईंडली लिहिणे म्हणजे माझ्याबद्दल लिहायचे असेल तर जिचे कुरळे केस आहेत, ती मनालीची आहे, सायको आहे असे काही पत्रकार लिहितात. कारण खरे या लोकांना छापायचे नसते, असे अगणित आरोप त्याच्यावर करण्यात आले आहेत. काही बॉलीवूडमधील काही माफियांनी गिधाडे, घारी आणि कावळ्यांच्या रुपात त्यांचे पत्रकार पाळले आहेत. सुशांतची यथेच्छ बदनामी ज्यांनी केली. त्याला ज्याचा त्रास होऊ लागला. हे असले पत्रकार मेन्टल, इमोशनल, सायकोलॉजिकल लिंचिंगमध्येच धन्यता मानतात.

मणिकर्णिका हा माझा चित्रपटाही ठरवून पाडण्याचा प्रयत्न झाला होता. तुम्हाला असल्या बातम्या वाचून खरतर आनंद होतो. पण तुम्ही कधी हा विचार केला आहे का? घराणेशाहीतून आलेल्या बॉलिवूडच्या कलाकारांबद्दल असे काही का लिहिले जात नाही? त्यांच्यापैकी कुणाच्याही गळ्यात असा आरोपांचा दोर का लटकवला जात नाही? जेव्हा अशा लोकांवर किंवा उद्या तुमच्यावर ही वेळ येईल तेव्हाच तुम्ही समजू शकता की सुशांत नेमका कोणत्या परिस्थितीतून जात होता.

कंगनाने सुमारे अडीच मिनिटांच्या व्हिडीओत बॉलीवूड माफिया, घराणेशाही, मानसिकता कशी हळूहळू बिघडवली जाते यावर भाष्य केले आहे. त्याचबरोबर तिने स्वतःला सिनेपत्रकार म्हणवणाऱ्यांचीही यथेच्छ निंदा केली आहे. हा व्हिडीओ तिच्या ऑफिशियल इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे.

Leave a Comment