कोरोनाबाधितांच्या संख्येत होत असलेल्या वाढीबाबत आरोग्यमंत्र्यांचा महत्त्वाचा खुलासा


मुंबई – देशात कोरोनाचा सर्वात मोठा हॉटस्पॉट ठरलेल्या महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत होणारी वाढ ही राज्य सरकार आमि प्रशासनासाठी डोकेदुखीचा विषय बनत आहे. राज्य पातळीवर सरकारच्या त्यासंबंधी विविध उपाययोजना सुरू आहेत. त्यातच आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नव्याने नोंद होणाऱ्या रूग्णसंख्येवर आपले मत व्यक्त केले.

तब्बल दोन-अडीच महिने लॉकडाऊनमध्ये असलेले आपले राज्य आता अनलॉक होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. ज्याची सुरुवात झाल्यानंतर राज्य सरकारकडून विविध नियम आणि अटी पाळण्यासंबंधी सूचना देण्यात आल्या आहेत. पण त्याकडे नागरिक साफ दुर्लक्ष करताना दिसून येत आहे. तसेच मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग हे नियम न पाळण्यानेच आणि पुरेशी काळजी न घेतल्यामुळेच राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात वाढ होत असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

आणखी काही दिवस सरकारने घालून दिलेले नियम पाळायला हवेत. आता लॉकडाऊन जास्त दिवस पवडणारा नाही आणि ते राज्याच्या हिताच्या दृष्टीने योग्य नाही. यासंबंधीची काळजी आता नागरिकांनीच घ्यायला हवी, असे टोपे यांनी म्हटले आहे. आज राज्यातील सर्व महापालिका आयुक्त, विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीत विविध शहरांतली कोरोना परिस्थितीवर चर्चा करण्यात आली.

Leave a Comment