संगीतक्षेत्रात सिनेक्षेत्रापेक्षा जास्त ‘गटबाजी’


अभिनेता सुशांत सिंह राजपुत याच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमध्ये सुरु असलेल्या कंपूशाहीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याचदरम्यान सिनेसृष्टीतील दिग्गज सेलिब्रेटी या वादळात अडकले आहेत. त्यातच आता बॉलीवूडचा प्रसिद्ध गायक सोनू निगमने देखील सिनेक्षेत्रापेक्षा जास्त माफिया संगीत क्षेत्रात असल्याचा आरोप केला आहे.

View this post on Instagram

You might soon hear about Suicides in the Music Industry.

A post shared by Sonu Nigam (@sonunigamofficial) on


आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर सोनू निगम याने एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्याने ज्यात संगीत क्षेत्रातील गटबाजीबाबत भाष्य केले आहे. सोनूच्या म्हणण्यानुसार, नवीन आणि कुशल गायकांच्या प्रगतीत हे म्युझिक माफिया अडथळे आणतात. त्यांच्याकडून अनेक मोठे संगीत दिग्दर्शक आणि गायकांचे काम काढून घेतले. कारण, त्यांना काम देण्यापासून काही मोठ्या अभिनेत्यांनी रोखले होते. बॉलिवूडपेक्षाही संगीत क्षेत्रातील गटबाजी मोठी असल्याचे त्याचे म्हणणे आहे.

सोनूच्या म्हणण्यानुसार, खूप कमी वयात आपण काम करायला सुरुवात केली. आजच्या घडीला नवीन गायकांसोबत अनेक गीतकार, संगीत दिग्दर्शक आणि निर्माते काम करू इच्छितात. त्यामुळे अनेकदा त्याच्यासोबत काम करण्यात एखादी म्युझिक कंपनी अचानक नकार देते. मी स्वतः हे सगळे सहन केले आहे. पण, आता परिस्थिती अधिकच बिघडली असल्याचे सोनूचे म्हणणे आहे. बॉलिवूड आणि म्युझिक इंडस्ट्रीला त्याने इशारा देत हे जर वेळीच थांबवले नाही, तर संगीत क्षेत्रातूनही आत्महत्येची प्रकरणे उघड होतील, असे म्हटले आहे.

Leave a Comment