सुशांतच्या नावाने पुळका काढणाऱ्या केआरकेनेच केले होते त्याला सर्वाधिक ट्रोल


मुंबईमधील वांद्रे येथील आपल्या राहत्या घरी आत्महत्या करत आपले जीवन संपवले, त्याच्या आत्यहत्येमुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे. पण त्याच्या आत्महत्येनंतर आता बॉलीवूडमध्ये घराणेशाहीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


एकीकडे सुशांतच्या आत्महत्येनंतर करण जोहर, सलमान खान सारख्या सेलिब्रेटींना सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. दुसरीकडे सुशांतबद्दलचे अनेक जुने व्हिडीओ व पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यांनी सुशांतची खिल्ली उडवली होती, असे काही जण नेटक-यांच्या निशाण्यावर आले आहेत. त्याचबरोबर सोशल मीडियावर #FakeKRKRealCulpritOfSushant आणि #JusticeForSushantSinghRajput हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे.


त्यात बॉलीवूडचा स्वयंघोषित समीक्षक कमाल राशिद खान उर्फ केकेआर याचा समावेश आहे. कालच त्याने सुशांतच्या आत्महत्येनंतर काही महिन्यांपूर्वीच सुशांतचे करिअर संपले असल्याचे केआरकेने म्हटले होते. त्याचबरोबर कोणत्या कंपन्यांमुळे सुशांतचे करिअर उद्धवस्त झाले त्याचादेखील खुलासा केला होता. तसेच बॉलिवूडवर ठराविक ६ कंपन्यांचे वर्चस्व असून त्यांना एखादी व्यक्ती जर आवडत नसेल तर ते त्याचे करिअर उद्धवस्त करुन टाकतात, असे आपल्या ट्विटमध्ये केआरकेने म्हटले होते. त्याचबरोबर काही प्रोडक्शन हाऊसची नावेही त्याने दिली होती.


त्याच केआरकेने सुशांतच्या जुन्या चित्रपटांची समीक्षा करताना सुशांतबद्दल खूप काही वाईट बोलला होता. सध्या सोशल मीडियावर त्याचे ते सगळे ट्विट व व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्यामुळे आता केआरके नेटकऱ्यांच्या रडावर आला आहे. केआरकेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तो त्यात सुशांतला नाही नाही ते बोलताना दिसत आहे.


सुशांतला अभिनय येत नाही. अशा अभिनेत्यांना 8 कोटी चार्ज करणा-यांवर फाइन ठोकायला हवा. लाखांची लायकी असलेल्या कलाकाराना 8 कोटी देत असाल, तर तो स्वत:ला शाहरूख खान समजू लागेल, असे केआरके सुशांतबद्दल या व्हिडीओत म्हणत आहे. या व्हिडीओसोबतच केआरकेने सुशांतबद्दल केलेले ट्विटही व्हायरल झाले आहेत. सुशांत एक सुमार अभिनेता असल्याचे केआरके यातही म्हणत आहे. या सर्व ट्विटचे स्क्रिनशॉट्स शेअर करत चाहत्यांनी केआरकेला फैलावर घेतले आहे.

Leave a Comment