अभिनवच्या आरोपांवर सलीम खान यांनी सोडले मौन

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर अनेकांनी बॉलिवूडमधील घराणेशाहीवर निशाणा साधला आहे.  यानंतर दिग्दर्शक अभिनव कश्यप यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट लिहित सलमान खान आणि त्याच्या कुटुंबाने करिअर उद्ध्वस्त केल्याचा आरोप केला आहे. सलमान खान आणि त्याच्या भावामुळे हातातून सर्व प्रोजेक्ट गेल्याचे त्यांनी सांगितले. आता या आरोपांवर सलमानचे वडील सलीम खान यांनी उत्तर दिले आहे.

आणखी वाचा : सलमानच्या कुटुंबाने माझे करिअर उद्धवस्त केले, या दिग्दर्शकाने केला गंभीर आरोप

बॉम्बे टाईम्सशी बोलताना सलीम खान म्हणाले की, नक्की, आम्ही त्यांचे करिअर उद्धवस्त केले. आधी जा आणि त्यांचे चित्रपट पहा, मग आपण बोलू. त्यांनी माझे नाव घेतले, कदाचित त्यांना माझ्या वडिलांचे नाव माहित नसेल. त्यांचे नाव राशिद खान आहे. त्यांनी त्यांची नावे देखील घ्यायला हवी होती. त्यांना जे करायचे आहे ते करूद्या. ते काय बोलले यावर प्रतिक्रिया देऊन मला माझा वेळ घालवायचा नाही.

Leave a Comment