सलमानच्या कुटुंबाने माझे करिअर उद्धवस्त केले, या दिग्दर्शकाने केला गंभीर आरोप

सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये घराणेशाहीवर आरोप केले जात आहेत. सुशांतच्या मृत्यूनंतर आता दिग्दर्शक अभिनव कश्यपने फिल्म इंडस्ट्रीवर निशाणा साधला आहे व पोलिसांना सुशांतच्या आत्महत्येची प्रकरणाची चौकशी करण्याचे आवाहन केले आहे. अभिनव कश्यप यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये सलमान खानचे कुटुंब, यशराज फिल्म्स आणि इंडस्ट्रीवर अनेक आरोप केले आहेत.

अभिनव कश्यप यांनी आपल्या पोस्टमध्ये वायआरएफच्या एजेंसीवर आरोप केला आहे की, कदाचित अशा एजेंसीनीच सुशांतला हे पाऊल उचलण्यास प्रेरित केले असावे. या प्रकारच्या एजेंसी कलाकाराचे करिअर बनवत नाही, तर त्यांचे करिअर उद्धवस्त करतात. त्यांनी लिहिले की सुशांतच्या आत्महत्याने इंडस्ट्रीची ती समस्या समोर आणली आहे ज्याच्याशी आमच्या सारखे लोक सामना करतात. एखाद्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्यासाठी अशी कोणती गोष्ट असू शकते ? मला भिती आहे की त्याचा मृत्यू मी टू आंदोलनाप्रमाणेच एका मोठ्या मूव्हेंटची सुरूवात नसावी.

My appeal to the Government to launch a detailed investigation. Rest in peace Sushant Singh Rajput… Om Shanti.. But…

Posted by Abhinav Singh Kashyap on Monday, June 15, 2020

कश्यप यांनी आपले करिअर उद्धवस्त करण्यासाठी सलमान खान आणि त्याच्या कुटुंबावर आरोप केले आहेत. त्यांनी लिहिले की, माझा अनुभव या सर्व गोष्टींपेक्षा वेगळा नाही व मी सुद्धा हे सहन केले आहे. 10 वर्षांपुर्वी ‘दबंग 2’ च्या मेकिंगमधून मी बाहेर पडण्याचे कारण होते की अरबाज खान आणि सोहेल खान आपल्या कुटुंबासोबत मिळून माझे करिअर नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत होते. मला धमकवण्यात-घाबरवण्यात आले. श्री अष्टविनायक फिल्म्ससोबत असलेला माझा दुसरा प्रोजेक्ट देखील खराब केला. हा प्रोजेक्ट मी प्रमुख राज मेहता यांच्या सांगण्यावरून साइन केला होता. त्यांना माझ्यासोबत काम केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली. मी श्री अष्टविनायक फिल्म्सला पैसे परत दिले व पुन्हा वायकॉम पिक्चर्समध्ये आलो. त्यांनी देखील तसेच केले. मात्र यावेळी नुकसान पोहचवणारा सोहेल खान होता आणि त्याने तेथील सीईओ विक्रम मल्होत्राला धमकी दिली. माझा प्रोजेक्ट हातातून गेला होता व मला साइनिंग फी 7 कोटी आणि जवळपास 90 लाख व्याज परत करावे लागले. यानंतर मला वाचवण्यासाठी रिलायन्स एंटरटेन्मेंट समोर आले व आम्ही मिळून बेशरम या चित्रपटावर काम केले.

कश्यप यांनी पुढे लिहिले की, माझे सर्व प्रोजेक्ट्स हातातून गेले. मला जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आले. माझ्या कुटुंबातील महिला सदस्यांना बलात्काराच्या धमक्या दिल्या. या सर्व घटनांमुळे माझ्या मानसिक आरोग्यवर परिणाम झाला व 2017 मध्ये घटस्फोट व कुटुंबापासून वेगळे होण्यापर्यंत प्रकरण गेले. या 10 वर्षात माझे शत्रू कोण आहेत ते मला समजले आहेत. ते सलीम खान, सलमान खान, अरबाज खान आणि सोहेल खान आहेत. तसे तर अनेक छोटे-मोठे मासे आहेत, मात्र सलमान खानचे कुटुंब या सर्व विषारी सापांचे प्रमुख आहे. ते आपल्या ताकदीचा कोणलाही घाबरवण्यासाठी वापर करतात.

Leave a Comment