मुख्यमंत्र्यांच्या पत्नीच्या वडीलांचे अल्पशा आजाराने निधन


मुंबई – मुंबईतील अंधेरी येथील क्रिटीकेअर हाँस्पिटलमध्ये राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सासरे व रश्मी ठाकरे यांचे वडील माधव गोविंद पाटणकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. ते ७८ वर्षाचे होते. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. माधव पाटणकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत श्रद्धांजली अर्पण केली आहे. सुप्रिया सुळे यांनी पाटणकर आणि ठाकरे कुटुंबावर कोसळलेल्या दु:खात आम्ही सहभागी आहोत अशी भावना व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Leave a Comment