पाकिस्तानातील दूतावासातून दोन भारतीय अधिकारी बेपत्ता


नवी दिल्ली – पाकिस्तानातील दूतावासात कार्यरत असलेले दोन भारतीय अधिकारी बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. परराष्ट्र मंत्रालयाने याप्रकरणी तातडीने पाकिस्तानाकडे हा मुद्दा उपस्थित केला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार भारतीय दूतावासाचे इस्लामाबादमध्ये कार्यालय असून, दोन्ही अधिकारी सोमवारी बेपत्ता झाले आहेत. अधिकारी बेपत्ता होऊन काही कालावधीच झाला असून याप्रकरणी तातडीने पाकिस्तानाकडे हा मुद्दा परराष्ट्र मंत्रालयाने उपस्थित केला आहे.

दरम्यान, पाकिस्तानाच्या भारतातील उच्चायुक्त कार्यालयातील दोन अधिकाऱ्यांनी हेरगिरी केल्याप्रकरणी भारत सरकारने ३१ मे रोजी त्यांना 24 तासात देश सोडून जाण्याचा आदेश दिले होते. तर पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजेंस (आयएसआय) च्या माध्यमातून जूनच्या पहिल्या आठवड्यात इस्लामाबादमध्ये तैनात शीर्ष भारतीय मुत्सद्दी गौरव अहलुवालिया यांना त्रास देण्याचे प्रकरण समोर आले होते. दुचाकीवरून अहलुवालिया यांचा पाठलागही करण्यात आला होता.

Leave a Comment