डिप्रेशनने खचून जाऊ नका, या हेल्पलाईनवर कॉल केल्यास मिळेल तात्काळ मदत

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सर्वचजण स्तब्ध झाले आहेत. मुंबई पोलिसांनुसार सुशांतला मागील काही दिवसांपासून नैराश्याने ग्रासले होते, तो तणावात होता व डिप्रेशनचा उपचार देखील घेत होता. सुशांतच्या आत्महत्येनंतर मानसिक आरोग्य किती महत्त्वाचे आहे हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. मनोचिकित्सक नैराश्याने ग्रासलेल्या व्यक्तीला नेहमी आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्यास सांगत असतात. त्यांना समुपदेशनाची गरज असते. देशातील अनेक संस्था लोकांना नैराश्यामधून बाहेर येण्यासाठी मदत करतात.

Image Credited – heartofwellness

कोरोना व्हायरस संकटामुळे लाखो लोकांनी नौकऱ्या गमवल्या आहेत. लोक आपल्या घरी परतली आहेत. अशा स्थितीमध्ये अनेकांना नैराश्याने ग्रासले जावू शकते. लॉकडाऊनमध्ये सरकारने देखील डिप्रेशनच्या समस्यापासून सुटका व्हावी यासाठी हेल्पलाईन नंबर जारी केलेले आहेत. कोणत्याही मदतीसाठी या नंबरवर कॉल करून समस्या सोडवता येते. नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरो सायन्सच्या डॉक्टरांनी टोल फ्री नंबर 08046110007 जारी केला आहे. मानसिक तणावाचा सामना करणारे लोक नैराश्यात चुकीचे पाऊल उचलू शकतात. लोक आत्महत्येचा देखील विचार करतात. अशा स्थितीमध्ये या संस्था लोकांची मदत करतात.

Image Credited – NDTV

नैराश्याने ग्रासलेल्या लोकांची मदत करणाऱ्या संस्था –

  1. आसरा – 022- 27546669
  2. आईकॉल (iCall) – 022-25521111
  3. वंद्रेवाला फाउंडेशन फॉर मेंटल हेल्थ – 18602662345
  4. कूज  – 8322252525
  5. संजीवनी सोसायटी (दिल्ली) – 011-40769002
  6. स्पंदन (इंदुर) – 9630899002
  7. लाईफलाईन फाउंडेशन (कोलकत्ता) – 033-24637401
  8. काश्मिर लाईफलाईन (जम्मू-काश्मिर) – 18001807020
  9. BMC मेंटल हेल्थ (मुंबई) – 022- 24131212
  10. आशा हेल्पलाइन (चंडीगड) – 0172-2735446
  11. स्नेहा इंडिया फाउंडेशन (चेन्नई) – 044-24640050
  12. जमशेदपुर जीवन सुसाइड प्रिव्हेंशन (जमशेदपुर) – 0657-6555555
  13. रोशनी (हैद्राबाद) 040-66202000
  14. आय लाईफ (आंध्रप्रदेश) – 78930-78930
  15. आरोग्य सहायवाणी (कर्नाटक) 104
  16. स्नेहा (तामिळनाडू) – 044-24640050

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment