वेलिंग्टन – कोरोनावर यशस्वी रित्या मात करणाऱ्या न्यूझीलंडमधील सरकारचे सध्या जगभरातून कौतूक होत असल्यामुळे हा देश चर्चेत होता. पण आता न्यूझीलंड आणखी एका गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. न्यूझीलंड सरकारने लैंगिक शिक्षणाचे महत्व पटवून देण्यासाठी एक अत्यंत पुढारलेला, पण अनोखा फंडा आजमवला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
‘Kill It Real’ या ऑनलाईन मालिकेचा एक भाग अलिकडेच एक जाहिरात म्हणुन प्रसिद्ध करण्यात आला आहे. पण जाहिरातीत अश्लील कंटेंट आणि याचा अल्पवयीन मुलांवर होणारा परिणाम याकडे लक्ष वेधणारी गोष्ट सांगण्यात आली आहे. दोन खरे पॉर्न स्टार या जाहिरातीमध्ये एका महिलेला तिचा मुलगा पॉर्न व्हिडीओ ऑनलाइन पाहात असल्याचे सांगतात, पण त्या मुलावर ही आई न चिडता त्याला समजवण्यासाठी काय करता येईल याचा विचार करताना दाखवली आहे. त्याचबरोबर या जाहिरातीत ही समज देण्यासाठी कोणती आणि कुठे मदत मिळेल हेही सांगण्यात आले आहे. या जाहिरातीच्या कल्पनेचे सध्या अनेक माध्यमातून कौतूक होत आहे.
लैंगिक शिक्षणाचे महत्व पटवून देण्यासाठी न्यूझीलंड सरकारचा अनोखा फंडा
या जाहिरातीमागे सरकारचे पालकांना मुलांना लैंगिक शिक्षणाबद्दल बोलण्यास प्रोत्साहित करणे आणि हे पॉर्न व्हिडीओज आणि वास्तव यात काय फरक आहे हे समजावण्यासाठी प्रेरणा देणे असे उद्दीष्ट आहे. विशेषतः सेक्स संबंधात संमती आणि आदर या विषयावर देखील या जाहिरातीच्या माध्यमातून भाष्य करण्यात आले आहे.
This NZ advert came up on my feed about the difference between real life relationships and pornography and I think it’s worth a watch 🙂 pic.twitter.com/rhyr6DUM2t
— KittArts (@sir_scandalous) June 12, 2020
ट्विटरवरही हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, जिथे याला 2.8 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज आणि 22,000 हून अधिक रिट्विट मिळाले आहेत. ही जाहिरात बघून अनेकांनी कौतुक केले आहे. या जाहिरातीत दाखवलेल्या आईची भूमिका लोकांनी समजून घेणे महत्वाचे आहे. अशीच वागणूक सुज्ञान पालकांकडूनही अपेक्षित आहे. सध्या न्यूझीलंड सरकारच्या या अभिनव तसेच अनोख्या उपक्रमाचे कौतुक आहे. सरकारने काळाची गरज ओळखून हा एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला असल्याचे अनेक जाहिरात तज्ञांनी म्हटले आहे.