VIDEO : पाकिस्तानी मौलवींचा जावईशोध; तुम्ही झोपल्यावर कोरोनादेखील झोपी जातो


इस्लामाबाद : जगभरातील बहुतांश देशांमध्ये कोरोना व्हायरसने अक्षरशः थैमान घातले आहे. त्याला पाकिस्तान देखील अपवाद नाही. कारण पाकिस्तानातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 1,35,700 च्याही पुढे गेला आहे. यापैकी 51,518 रुग्ण सिंध प्रांत, 50,087 पंजाब प्रांतात, 17,450 खैबर-पख्तुनख्वा भागात, 7,866 बलुचिस्तानात, 7,163 इस्लामाबादमध्ये, 1,044 गिलगीट बाल्टिस्तानमध्ये तर 574 पीओकेमध्ये आहेत.


त्याच दरम्यान आता सोशल मीडियात पाकिस्तानातील एका मौलवींचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. पण या व्हिडीओमध्ये मौलवींनी लावलेल्या जावईशोधामुळे त्यांची खिल्ली देखील उडवली जात आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी भरपूर झोपा, असा सल्ला देताना या व्हिडिओ क्लीपमध्ये एक मौलवी दिसत आहेत.

मौलवी या व्हिडिओमध्ये म्हणतात, आपले डॉक्टरच स्वतः आपल्याला सांगत आहेत, की तुम्ही अधिक झोपा. जेवढ्या जास्त वेळ तुम्ही झोपाल, तेवढा वेळ तुमच्या भोवती असलेला व्हायरसही झोपलेला असेल आणि तो तुमचे काहीच नुकसान करणार नसल्यामुळे तो तुम्ही झोपल्यावर झोपी जातो, आणि तुमच्या मृत्युनंतर तो मरतोसुद्धा. पत्रकार नाइला इनायत यांनी हा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे.

Leave a Comment