कोल्हापूर : देशासह राज्यात सध्या मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावल्यामुळे राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये पेरणीच्या कामाला वेग आला आहे. त्यातच छत्रपती संभाजीराजेंनी कोल्हापूर जिल्ह्यातील केर्ली परिसरातील एका शेतात सुरु असलेल्या पेरणीच्या वेळी चक्क शेतात जाऊन शेतकऱ्यांसोबत तिफण ओढली. सध्या सोशल मीडियावर त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
VIDEO; छत्रपती संभाजीराजेंनी अनुभवले बळीराजाचे कष्ट
शेतकऱ्याच्या पायाला भेगा का पडतात? स्वतःच्या घामाने धरतीला भिजवून जगाला पोसणाऱ्या बळीराजाला किती कष्ट सोसावे लागतात? याचा अनुभव घेता आला. तिफणीला ओढताना एका फेरीतच माझा श्वास फुलून गेला, मला लगेच मास्क काढून ठेवावा लागला. pic.twitter.com/DvdxoXQmx4
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) June 13, 2020
याची माहिती देण्यासाठी संभाजी राजेंनी ट्विटरवर काही ट्विट केले आहेत. धरणी मातेला स्वतःच्या घामाने भिजवून जगाला पोसणाऱ्या बळीराजाला किती कष्ट सोसावे लागतात याचा अनुभव यानिमित्ताने घेता आला. माझा श्वास तिफणीला ओढताना एका फेरीतच फुलून गेल्यामुळे लगेच मला मास्क काढून ठेवावा लागला, असे संभाजीराजे यांनी म्हटले आहे.
मी स्वतःच्या शेतातून घरी येत असताना, वाटेत एक संपूर्ण कुटुंब शेतात पेरणी करत असताना दिसले. गाडी पुढे गेली, पण मला ते दृश्य पाहून राहवलं नाही. परत गाडी वळवली आणि त्यांच्याकडे गेलो. सुरुवातीला संकोच वाटला की मी कसा जाऊ? त्यांना कसं विचारू?परंतु न कळत मी त्यांच्या रानात ओढला गेलो.
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) June 13, 2020
कोरोना मुळे संपूर्ण जगाला थांबलं. पण बळीराजाला थांबून चालणार नाही, अन तो थांबणारही नाही.
हा अनुभव मला समृद्ध करून गेला. जगाच्या पोशिंद्या शेतकरी राजाचे संपूर्ण जगाने ऋण व्यक्त करत त्यांचा सन्मान केला पाहिजे.
(अंगमेहणीतीचे काम नसताना, इतरवेळी सर्वांनी मास्क वापरणे गरजेचे आहे.)
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) June 13, 2020
संपूर्ण जगाला कोरोनाच्या संकटामुळे थांबावे लागले. पण बळीराजाला थांबून चालणार नाही, अन तो थांबणारही नाही त्याचबरोबर हा अनुभव मला समृद्ध करून गेला. जगाच्या पोशिंद्या शेतकरी राजाचे संपूर्ण जगाने ऋण व्यक्त करत त्यांचा सन्मान केला पाहिजे, अशी भावना संभाजीराजे यांनी व्यक्त केली.