‘प्रोजेक्ट प्लॅटिना’; देशातीलच नव्हे तर जगातील पहिले राज्य ठरणार महाराष्ट्र


मुंबई – देशात कोरोना या जीवघेण्या व्हायरसचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला असून देशात कोरोनाबाधितांची सर्वाधिक संख्या एकट्या महाराष्ट्रात आहे. त्याचबरोबर या रोगाच्या विरोधातील लढाईत राज्य सरकार कोणतीही कसर बाकी ठेवत नाही आहे. राज्य सरकारने नुकतेच कोरोना रूग्णांवर रेमडेसिवीर इंजेक्शनद्वारे उपचार करणे सुरू केले आहे. त्यातच आता राज्य सरकारने ‘प्रोजेक्ट प्लॅटिना’ मोहिम हाती घेतली आहे.

प्रोजेक्ट प्लॅटिना या मोहिमेवर महाराष्ट्रातील 21 महाविद्यालयांमध्ये काम सुरू केले जाणार असून तब्बल 500 कोरोना बाधितांवर या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात उपचार केले जाणार आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात या थेरपीची ट्रायल घेणारे देशातीलच नव्हे तर जगातील महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरणार आहे.

काय आहे प्लाझ्मा थेरेपी
पूर्णपणे कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीच्या शरीरात रोगप्रतिकारक क्षमता वाढवणाऱ्या पेशी तयार झालेल्या असतात, सध्या कोरोनाबाधित असलेल्या रूग्णांच्या शरीरात त्याच्या कोरोनामुक्त झालेल्याच्या पेशी टाकल्या जातात. त्यामुळे कोरोनाग्रस्ताची रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते आणि यामुळे कोरोनाबाधित लवकरात लवकर बरा होण्याची शक्यता अधिक असते, या सगळ्या प्रकाराला प्लाझ्मा थेरपी असे म्हणतात.

रिकव्हरी रेट म्हणजे रूग्ण ठणठणीत बरा होण्याचा दर प्लाझ्मा थेरपीमुळे वाढू शकतो, ही खूप दिलासादायक बाब आहे. सर्वप्रथम अमेरिकेत प्लाझ्मा थेरपी ही पार पडली होती. कोरोनाला नाश करण्यासाठी प्लाझ्मा थेरपी ही खूप उपयोगी ठरणार आहे. राज्याचा कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असताना प्लाझ्मा थेरपीमुळे रूग्ण बरे देखील होत आहेत. मुंबईनंतर आता पुण्यात देखील प्लाझ्मा थेरपीला यश मिळाले आहे. तसेच या थेरपीला महाराष्ट्रात देखील काही प्रमाणात यश मिळत आहे.

Leave a Comment